रिमडोह परिसरात दुसर्यांदा पुन्हा कपंनीत लागली आग.(brekingnews )

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

brekingnews:दि.12 राष्ट्रीय महामार्गावरील रिमडोह परिसरात के.बी. पेपर मिल्स प्रो. दिनेश कोचर यांच्या कंपनीला आज 12 वाजता वेस्टेज मटेरीयलला आग लागून लाखोचे नुकसान झाले. कंपनीत उघड्यावर ठेवलेल्या पेपर वेस्ट मटेरियलला आग लागली,

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानीक नगरपरीषद, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पुलगाव येथील फायर ब्रिगेडला बोलावण्यात आले.जवळ्पास सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही आग धुमसत असून अग्निशमन यंत्रणा आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणतीही जीवितहानी झाली नसून उघड्यावर आग लागल्याने कपंनीचे आतील कोणतेही नुकसान झाले नाही.
या जळालेल्या वेस्ट मटेरियल पासून येथे खरड्याचे पेपर रोल बनविण्याचे काम येथे केल्या जाते.

brekingnews:या वेस्ट मटेरियल कचऱ्याचे तापमान वाढल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज येथील काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.तसेच काही दिवसा अगोदर याच परिसरात श्रेयांश खर्डा कपंनी ला दी. 6 तारखेला आग लागली होती.

Leave a Comment