पाण्याची टाकी जमीन दोस्त झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण? कार्यवाही करण्यासाठी झोपेचे सोंग,जीवनावश्यक गरजच झाली दूर्लक्षीत….?( brekingnews )

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

brekingnews:बुलडाणा:-संग्रामपूर तालुक्यातील चिचारी हे आदिवासी बहुल भाग असलेला छोटंसं गाव, गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होवू नये.

यासाठी गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली होती.परंतू काही दिवसांपासून गावात पाण्याची टाकी अचानक जमीन दोस्त झाल्याने पाण्याचा प्रश्न पेटला आहे.

मेहकर विधानसभा मतदारसंघ काॅंग्रेसला सोडण्यात यावे:-कॉंग्रेसची पत्रकार परिषद (Congress )

तरीही शासन व प्रशासन डोळेझाक करीत असून आंधळे पणाचे सोंग घेतल्याचे चित्रण पहायला मिळत आहे.अजूनपर्यत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.शासन आणि प्रशासन डोळेझाक करीत आहेत,कुंभकर्णाच्या स्थितीत आहेत की काय?

असा प्रश्न उपस्थित होत आहे? आमच्या प्रतिनिधीला अशी माहिती प्राप्त झाली की टाकीच्या बांधकामात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे अशी अवस्था बघायला मिळते आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अशी सगळीकडे चर्चा पण सुरू आहे.त्यामुळे संबंधित ठेकेदार टेंडर यांच्यावर कारवाई का केली नाही?वरिष्ठ अधिकारी सदर प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

brekingnews : परंतू अद्याप ही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.कुणाचा आशिर्वाद आणि कुणाचा पाठिंबा आहे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.ब्युरो रिपोर्ट सूर्या मराठी बुलढाणा.

प्रतिकिऱ्या 👇👇👇👇

चिचारी येथिल निकृष्ट बांधकाम केलेला जलकुंभ कोलमडून पडल्या प्रकरणी संबंधित विभागाकडे रितसर तक्रारी केल्या आहेत, मतदार संघातील आदिवासी भागात असे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होऊन ते नामशेष होत आहेत,

 

पण या भ्रष्टाचार बाबत लोकप्रतिनिधी सभागृहात ब्र शब्द बोलत नाहीत. अर्थातच सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वाद घेऊन अधिकारी व ठेकेदार निधड्या छातीने मोकळे फिरत असुन कोणत्याही प्रकारची कारवाई होतांना दिसत नाही.

रितसर तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून दोषींवर कारवाई होत नसेल तर लवकरच आम्ही न्यायालयात जाणार..

प्रशांत डिक्कर
विदर्भ अध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

Leave a Comment