अनिलसिंग चव्हाण / बुलढाणा
brekingnews:चिचारी येथील पाण्याची टाकी कोसळुन झालेल्या शासनाच्या नुकसाना बद्दल कार्यकारी अभियंता थोरात व कनिष्ठ अभियंता कोरडे तसेच संबधीत ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे बाबत
अॅड. जि.ए. क्षीरसागर व अॅड. पि. के. घाटे यांचे जिल्हाधिकारी बुलढाणा यांना लेखी निवेदन सादर.
मौजा चिचारी ता. संग्रामपूर या आदिवासी गावात जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागा मार्फत पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाकीचे काम सुरु असुन सदर पाण्याची टाकी ही निकृष्ठ दर्जाची बांधल्यामुळे सदर कामात भ्रष्टाचार झाल्यामुळे सदर पाण्याची टाकी ही कोसळली आहे.
सदर बांधकाम पूर्ण होण्याच्या आधीच पाण्याची टाकी कोसळल्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान झाले आहे.सदर काम हे कार्यकारी अभियंता थोरात व कनिष्ठ अभियंता कोरडे यांच्या देखरेखीखाली सुरु होते.
मुला बाळासह तामगाव पोलीस स्टेशनला आमरण उपोषण चा इशारा…( policenews )
त्यामुळे दोन्ही अभियंता यांनी ठेकेदाराच्या निकृष्ठ कामाकडे हेतुपुरस्सर व आर्थीक प्रलोभनाने दुर्लक्ष करुन सदर बांधकाम करुन घेतले व ठेकेदाराचे बिल काढून त्याचा आर्थीक लाभ करुन दिला आहे. टाकी कोसळल्याने कोणत्याही प्रकारची जिवीतहाणी झाली असती तर त्याला संबधीत अभियंता व ठेकेदार हे पुर्णतः जबाबदार होते.
त्यामुळे आपणास या निवेदनाव्दारे खालील प्रमाणे मागणी करण्यात येत आहे की कार्यकारी अभियंता थोरात, कनिष्ठ अभियंता कोरडे व संबधीत ठेकेदार यांच्यावर शासनाची आर्थीक फसवणुक केल्या बाबत तसेच लोकांच्या जिवीतास हाणी पोहचेल असे कृत्य केल्या बाबत तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचप्रमाणे संबधीत कामाची आजपर्यंत ठेकेदाराला दिलेली रक्कम तात्काळ वसुल करावी.संबधीत ठेकेदार यांचे कंत्राट रद्द करुन त्याला काळ्या यादीत(ब्लॅक लिस्ट)करण्यात यावे.
brekingnews:अशा लेखी मागणीसह अॅड. जि.ए. क्षीरसागर व अॅड. पि. के. घाटे संग्रामपूर ता. संग्रामपूर जि. बुलडाणा यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर केले आहेत.या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.