जळगाव जामोद येथील घटना मालवाहू चार चाकी चालकाने दुचाकी ला धडक दिली व दुचाकी सवाराला बेवारस जंगलात फेकून दिले ( breakingnews )

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

breakingnews: जळगांव जामोद,जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत २९ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास निमखेडी ते सुनगाव रोडवर मालवाहू चारचाकी गाडी क्रमांक एम एच २७ बी ५३८२ च्या चालकाने दुचाकी क्रमांक एम एच २८ एच ९१८९ ला धडक दिली.

यामध्ये दुचाकीस्वार मनसाराम छत्तरसिंग वासकले राहणार मेंढामारी हा गंभीर स्वरूपात जखमी झाला. तेव्हा जखमीला दवाखान्यात नेतो असे सांगून चार चाकी चालकाने त्याला गाडीमध्ये टाकले व जंगलात बेवारस सोडून दिले.

सदर जखमीला योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत मृतकाचा भाऊ गमदास छत्तरसिंग वासकले यांनी १ मे २०२४ रोजी जळगाव जामोद पोलिसात याविषयी तक्रार दाखल केली आहेत, त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले.

धर्मविर आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाने हिंदू धर्म रक्षक धर्मविर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती संपन्न होणार आहे ( sanjaygaikwad )

आहे की, चारचाकी वाहन क्रमांक एम एच २७ बी ५३८२ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणाने

चालवून माझ्या भावाला धडक दिली. तेथील उपस्थित लोकांनी व वाहन चालकाने त्याला गाडीम ध्ये टाकले व चालक म्हणाला की मी उपचारासाठी दवाखान्यात नेतो परंतु सदर चारचाकीच्या चालकाने बुऱ्हाणपूर रोडवरील शांतीलाल सस्त्या यांच्या शेतालगत असलेल्या जंगलात जखमी मनसाराम यास गाडीतून फेकून दिल. मनसाराम याला योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी चार चाकी चालका विरोधात कलम २७९, ३३७, ३०४, २०१ भांदवी सह १३४/ १८६ मोटर वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

breakingnews:जळगाव जामोद पोलिसांनी चारचाकी चालक योगेश सोपान महाजन राहणार बोरसर यास अटक केली असून, पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय इंगळे पोलीस कॉन्स्टेबल प्रेम सिंग पवार हे करीत आहेत.

Leave a Comment