छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कचर्याच्या ढिगार्यात फेकलेल्या अवस्थेत.
गोंदिया, ता. 20 -जिल्ह्यातील सडक/अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत सौन्दड येथे, चक्क महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे. प्रकरण असे आहे की – ग्राम पंचायत सौन्दड यांनी जुनी जीर्ण झालेली इमारत पाडून त्याचे नाविनिकरन करण्याचे काम काही दिवसांपूर्वी चालू केले आहे.
त्यातच दुसरीकडे नवीन इमारतीत कार्यालय चालू केले आहे, तर जुन्या इमारती मध्ये असलेले साहित्य हलवले, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नवीन ठिकणी न करता त्या मूर्तीला फेकून दिले आहे, सध्याच्या स्थितीत मूर्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेल्या अवस्थेचे चित्र आहे, समोरच्या बाजूला दुकान गाडे आहेत.
अश्यात नागरिक मूत्र विसर्जन करण्यासाठी मागच्या बाजूला पडलेल्या इमारतीकडे जातात, अश्यात फेकलेल्या अवस्थेत मूर्ती पाहून काही नागरीकांनी अमच्यासी संपर्क केला, व वृता बाबद माहिती दिली आहे, ग्राम पंचायत चे पदाधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनी मूर्तीची दखल न घेता फेकून दिली असल्याचे चित्र आहे, एकंदरीत ग्राम पंचायत सौन्दड तर्फे महा पुरुषांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची चर्चा परिसरात वार्या सारखी पसरली आहे, यावर सत्तेत असलेली शिवसेना पक्ष काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष्य लागले आहे.