भाजपाचे जिल्हा विस्तारित अधिवेशन लोणार येथे संपन्न ( bjpnews )

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

bjpnews:भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्यस्तरीय मुख्य अधिवेशन नुकतेच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 जुलै रोजी पुणे येथे पार पडले.

त्यानंतर आता लोणार सरोवर येथील श्री मंगल कार्यालयात भाजप प्रमुख पदाधिकाऱ्यांचे बुलढाणा जिल्हास्तरीय विस्तारित अधिवेशन जिल्हा अध्यक्ष डॉ.गणेश मांन्टे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.

या अधिवेशनाला प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर अधिवेशनाला मार्गदर्शन केले.

अण्णाभाऊ साठेंचे विचार समाजाला एकसंघ करणारे प्रा.डॉ. गोपाल बछिरे ( lonarnews )

यासोबतच माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा समन्वयक मोहन शर्मा,माजी आमदार तोताराम कांयदे, प्रदेश सदस्य विजय कोठारी,प्रताप सिंह राजपूत,उल्हास देशपांडे, विधानसभा निवडणुक प्रमुख प्रकाश गवई, चिखली विधानसभा प्रमुख सुनील वायाळ,जिल्हा सरचिटणीस

गजानन घुले,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत, विश्राम पवार,दिपक वारे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी स्मिता टिकेटकर, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष
सचिन काळे,सैनिक सेल जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय जाधव,व्यापार आघाडी प्रविण धन्नावात, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष देशमुख,सोशल मीडिया जिल्हा संयोजक उद्धव आटोळे यांच्यासह इतर आघाडी जिल्हाध्यक्ष तसेच सर्व मंडल अध्यक्ष व शहर मंडल अध्यक्ष यांची उपस्थिती होती.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले, तसेच लाडली बहीण योजना,प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अमृत योजना, रोजगार हमी,दीनदयाल विद्युतीकरण योजना, मूलभूत सुविधा प्रकल्प, डिजिटल इंडिया योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्वच्छ भारत योजना, उज्वल अशुरंस योजना, सर्वशिक्षा योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन,राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरुस्कुत योजनांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे, खनिकर्म यासारख्या विविध महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

bjpnews:या अधिवेशनासाठी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा व मेहकर या मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment