BIG BREKING 1 कोटीच्या विमा साठी बायकोने नवऱ्याला संपवले

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

ही घटना धक्कादायक आहे आता पर्यंत आपण आयकलेच असेल की नवरा बायको ही जोडी सात जन्माचे एकामेकाच्या दुःख सुखात साथ देणारे आहे पण या ठिकाणी जे घटना घडली ते विचार करणारीच आहे बायको न पैसा साठी केला चक्क मर्डर
एखाद्या गुन्ह्याबद्दलची किरकोळ शंकासुद्धा गुन्हा उघडकीस आणण्यास मदतीची ठरू शकते. असाच काहीसा प्रकार निलंगा येथे घडला आहे. नवऱ्याची १ कोटीची विमा पॉलिसी होती, ही विम्याची रक्कम मिळवण्यासाठी बायकोनेच नवऱ्याचा काटा काढल्याचा प्रकार तब्बल ८ वर्षांनी निलंगा येथे उघडकीस येऊ शकला आहे.या गुन्ह्याच्या तपासात विमा कंपनीला आलेला संशय आणि त्यानंतर पोलिसांनी शिताफीने केलेला तपास या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.

निलंगा तालुक्यातील निटूर या गावातील रहिवाशी आण्णाराव बनसोडे यांचा अपघाती मृत्यू २०१२ला झाला होता.

तशी पोलिसांत नोंदही होती. आण्णाराव यांनी १ कोटी रुपयांचा अपघाती विमा २०१०मध्ये उतरवला होता. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची बायको आणि कायदेशीर वारसदार ज्योती यांनी विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला होता.

या क्लेममधील काही माहिती विपर्यस्त होती, शिवाय व्यवसायाने फर्निचर बनवणारे आण्णाराव १ कोटीचा अपघात विमा का उतरवतील अशी शंका विमा कंपनीला आली. त्यांनी या प्रकाराची चौकशी औसा इथल्या पोलिस स्टेशनमध्ये केली आणि कंपनीला आलेली शंका पोलिस निरीक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली. पोलिसांनाही यात तथ्य वाटल्याने त्यांनीही बंद झालेली फाईल उघडून चौकशीला सुरुवात केली.

अन् काळेबेरे असल्याचा आला संशय…

दरम्यान, आण्णाराव यांच्या कुटुंबियांनाही या प्रकारात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय आला होता. त्यांनीही या प्रकरणात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी ज्योती हिला चौकशीला बोलावून घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण १ कोटी इतक्या रकमेची पॉलिसी कशी उतरवली, याचं उत्तर काही तिला देता येत नव्हतं. अखेर तिने पॉलिसीची रक्कम मिळवण्यासाठी नवऱ्याचा खून केल्याचे कबुल केले. ही पॉलिसी तिचा आतेभाऊ रमेश विवेकी हा विमा एजंट असून त्याने ही विमा पॉलिसी उतरल्याचं तिने सांगितलं.

गळा दाबून खून, मृतदेह महामार्गावर नेऊन टाकला

विमा पॉलिसी उतरवतानाचा विम्याची रक्कम हडपण्यासाठी आण्णाराव याचा खून करण्याचा कट ज्योती आणि रमेश यांनी रचला होता, असं पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले.

२०१२ त्यांनी आण्णाराव यांचा गळा दाबून खून केला, मृतदेह महामार्गावर नेऊन टाकल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिस आणि विमा कंपनीच्या सतर्कतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस येऊ शकला आहे.

हे आहेत आरोपी….

याप्रकरणी आरोपी 1) लहू विश्वनाथ कांबळे (वय 54, रा. लातूर), 2) गोविंद माधव सुबोधी (वय 36, रा. वायगाव सातळा, ता. उदगीर, 3) विमा एजंट रमेश भागवतराव विवेकी (वय 44), 4) वैजीनाथ तुळशीराम सुडे (वय 51) यांना अटक केली आणि काही दिवसांपूर्वी मयताची पत्नी ज्योती अण्णाराव बनसोडे (वय 35, रा. सुमठाणा) यांना लातूर स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी औसा पोलिसात आरोपी विरुद्ध पोलिस डायरीत 73/2014 अन्वये भादंवि 302, 201,120 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment