BeedSantosh Deshmukh :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात एक महत्त्वपूर्ण वळण आले आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीतील ताज्या अपडेट्स अनुसार, वाल्मिक कराड गँगच्या सुदर्शन घुले , जयराम चाटे आणि महेश केदार या तीन आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
ही कबुली या प्रकरणाला नवे वळण देऊन वाल्मिक कराडच्या विरोधातील पुराव्यांची ताकद वाढवणारी आहे.
सुदर्शन घुले याने पोलिसांना सांगितले की, आवादा कंपनीच्या आवारात त्याला आणि त्याच्या साथीदारांना मारहाण झाली होती.
त्यादिवशी त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस होता. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे त्यांना आव्हान देण्यात आले होते.
तसेच, खंडणी मागण्यात संतोष देशमुख अडथळा ठरत होते, हे घुले याने कबुली दिली. याचा बदला म्हणून त्यांनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा कबुलीजबाब दिला आहे.
9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. महेश केदार याने हत्या करताना व्हिडीओचा शूट केल्याची कबुली दिली,
BeedSantosh Deshmukh :तर जयराम चाटे याने त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत. या प्रकरणाच्या तपासात अॅड. उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचे पुरावे कोर्टात सादर केले आहेत. या पुराव्यांमुळे वाल्मिक कराड याच्या विरोधातील सर्व आरोप मजबूत झाले आहेत.