प्रतिनिधी सचिन वाघे
Bachhukadu:हिंगणघाट शेतकरी वर्गाची संपूर्ण कर्जमाफी करून निवडणूकींत महाविकास आघाडीने दिलेले आश्वासन त्वरित पूर्ण करावे.
या मागणीसाठी दि.11 एप्रिलला महात्मा फुले यांच्या व डॉ आंबेडकर यांच्या जयंतीच्या पर्वावर प्रहारच्या वतीने मध्यरात्री प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख गजानन कुबडे यांच्या नेतृत्वात विठोबा चौक येथून मशाल मोर्चाद्वारे आ. कुणावार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन सादर केले.व मागण्या त्वरित मान्य करण्याची विनंती केली.
Santoshdeshmukh/ बीडचा सरपंच आता “अपहरण” ते “हत्या” च्या प्रवासाचा धक्कादायक खुलासा
या प्रसंगी आ. कुणावार यांना दिलेल्या निवेदनातून केलेल्या मागणीनुसार, संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, शेतीचे सर्व कामे मनरेगा मधून करण्यात यावेत. व दिव्यांगाना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन आ. कुणावार यांना देण्यात आले.
Bachhukadu:यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख सूरज कुबडे, माजी जिल्हा प्रमुख देवा धोटे, प्रहार विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख अंकित दांडेकर,अंकुश वाघमारे, ऋषभ तडस, मयूर पुसदेकर, अमोल धारने, रमण दरवळकर, सुरज डफ यांचे सह शेकडो कार्यकर्तेसह शेतकरी उपस्थित होते.