Bachhukadu:दिनाक ९/४/२०२५ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने जळगाव जा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात सध्या महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून भाजपा सरकारने सांगितले होते
की आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू परंतु सरकारने दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने टेंबे आंदोलन करण्यात येत असून
आंदोलनात सहभागी आंदोलक हे गळ्यात निळा रुमाल व भगवा हातात घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी होतील आंदोलनातील प्रमुख मागणी शेतकरी कर्जमाफीत शेत मालाला हमीभाव मिळावा
व शेतकऱ्यां चे न्याय हक्काच्या मागण्या करिता पूर्ण करण्यासाठी दिनाक ११/४/२०२५ रोजी रात्री १२ वाजता जळगाव जामोद विधान सभेचे आमदार डॉ, संजय कुटे यांच्या घरासमोर टेवा प्रतीकात्मक शंततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.
निवेदनावर शंकर मोहनलाल पुरोहित, सौरभ बावसकर, सिद्धार्थ नारायण वानखडे, आकाश उत्तम वानखडे यांच्या सह्या असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सौरभ बावसकर यांनी मीडिया समोर बोलताना केले,
Bachhukadu :निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिकारी बुलडाणा, जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा, उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जा, व संस्थापक अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी आमदार ओम प्रकाश उर्फ बाच्चू भाऊ कडू यांना देण्यात आल्या,