इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव : शेकडो राम भक्तांना प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला घेऊन जाणाऱ्या शेगाव ते अयोध्या धाम या ‘अयोध्या आस्था रेल’ला हजारो रामभक्तांच्या उत्साहात आणि जल्लोषात आ डाॅ संजय कुटे यांनी हिरवा सिग्नल देऊन शुभारंभ केला. यावेळी जय श्री रामच्या घोषणांनी शेगाव रेल्वे स्थानक परिसरातील वातावरण राममय झाले होते.
सुमारे 500 वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि हजारो बलिदानानंतर अयोध्येत उभारलेल्या भव्य राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील रामभक्त आतुर आहेत. संत गजानन महाराजांची पावन भूमी असलेल्या शेगाव येथून अयोध्येपर्यंत ‘आस्था स्पेशल ट्रेन’ असल्याने रामभक्तांना सुरक्षित प्रवास आणि उत्तम सुविधेसह दर्शनाची संधी मिळणार असल्याचे आ डाॅ संजय कुटे यांनी सांगितले.
यावेळी आ डाॅ कुटे यांनी प्रत्येक रामभक्ताशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या, रेल्वे प्रशासनाने राम भक्तांना कुठेही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घेऊन अतिशय कौतुकास्पद नियोजन केले त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.
या पठ्ठ्याने गावाचा नाव मुंबईत चमकविले विनोद इंगळे यांना मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार( shegaonnews )
जिल्ह्यातून आणि विशेषतः आपल्या शेगाव नगरीतून या पहिल्या ट्रेनने अयोध्येला जाणारे रामभक्त अत्यंत भाग्यशाली आहेत.असेही आ डाॅ संजय कुटे आवर्जुन म्हणाले.’रामलला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे’ ही घोषणा व स्वप्न सत्यात उतरविल्याबद्दल मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार आ डाॅ संजय कुटे यांनी व्यक्त केले.
आ डाॅ संजय कुटे रामभक्तांना भेटून आस्थेने विचारपूस करत होते,तेव्हा अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रु तरळत होते.रामभक्तांच्या भावना दाटून आल्या होत्या,भावनिक वातावरण निर्माण झाले.एकीकडे आनंदाचा पूर आल्याचे चित्र स्टेशन परिसरात दिसून येत होते.
फटाक्याच्या आतषबाजीत, ढोल ताशाच्या गजरात वाजतगाजत रामभक्तांना आस्था ट्रेन पर्यंत पोहचून देण्यात आले.
ayodhanews: याप्रसंगी आ अॅड आकाश फुंडकर,जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,ऋषीकेश जाधव,माजी आ तोताराम कायंदे,डाॅ अपर्णाताई कुटे,विनोद वाघ,प्रमोद कुटे,राजेंद्र गांधी,प्रदिप सांगळे,बंडू पाटील,विजय भालतडक,गजानन जवंजाळ,पवन शर्मा, ज्ञानेश्वर साखरे ,दिपक शर्मा,राजेश अग्रवाल,सचिन ढमाळ,संतोष रायणे,शिवसेनेचे उमेश अवचार,संतोष लिप्ते आदीसह प्रमुख पदाधिकारी हजर होते.