वडीलांच्या स्मृतीदिनी डॉक्टर पुत्राचे आयोजन
कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.
गडचान्दुर-
अर्थ फाउंडेशन चे संचालक डॉ.कुलभूषण मोरे सरांनी आपल्या वडिलांच्या द्वितीय स्मृतीदिनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले व समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी ,रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत वडिलांना श्रद्धांजली अर्पण करत उपक्रमाचे कौतुक केले.
ज्येष्ठ समाजसेवक माजी आरोग्य सभापती तथा वनसंरक्षक अधिकारी स्वर्गीय हरिभाऊ मोरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन अर्थ फाउंडेशन द्वारा केले होते. याप्रसंगी मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटक सन्माननीय वामनरावजी चटप साहेब माजी आमदार तथा शेतकरी नेते यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले .
तथा स्वर्गीय हरिभाऊ मोरे यांच्या पुतळ्याला मालारपण करून विनम्र आदरांजली दिली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कटारे (जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर ) हे आवर्जून उपस्थित होते.
तर प्रमुख अतिथी मध्ये डॉक्टर स्वप्निल टेंभे तालुका आरोग्य अधिकारी कोरपना डॉ.आशिष बारबदे जिल्हा प्रोग्राम मॅनेजर टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर , डॉ.सुशील भोगावार न्यूरोसर्जन , डॉ.राधिका भोगाववार स्त्री रोग तज्ञ, डॉ. सुहास बेन्दले जनरल फिजिशियन , डॉ.स्नेहा बेन्दले दंतरोग तज्ञ , डॉ.तुषार भागवत बालरोग तज्ञ , डॉक्टर ट्विंकल डेंगळे दन्त रोग तज्ञ , प्राचार्य काळे, प्रा दुधगवळी , अंकुश काकडे , दत्तराज गायकवाड , महेश देवकते , अर्थ फाउंडेशनचे संचालक डॉक्टर कुलभूषण मोरे , डॉक्टर नंदिनी मोरे ,श्रीमती शशिकला मोरे , मनीषा मोरे , आँचल निकाळजे , समाधान निकाळजे एडवोकेट संतोष गायकवाड अनिकेत दुर्गे , शैलेश लोखंडे , सोयाम सर हे उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या उद्घाटनपर मार्गदर्शनात एड. वामनराव चटप साहेबांनी स्व हरिभाऊ मोरे साहेबांच्या सामाजिक तथा राजकीय कार्याचा उल्लेख केला तसेच डॉ कुलभूषण मोरे हे आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा सक्षम पने पुढे नेत आहेत आणि या आरोग्य शिबिराच्या उपक्रमाचे कौतुक केले. डॉ अशोक कटारे (जिल्हा आरोग्य अधिकारी) यानी आपल्या मार्गदर्शनात विविध आरोग्य योजनाची माहिती दिली व डॉ मोरे हे अर्थ फाउंडेशन च्या माध्यमातून करत असलेल कार्य उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन केले.
सूत्रसंचालन अनिकेत दुर्गे यानी केले तर आभार प्रदर्शन गणेश ढगे यानी केले. या आरोग्य शिबिरात जीवति व कोरपना तालुक्यातील दुर्गम भागातील।विविध आजाराच्या 600 च्या वर रुग्नानी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला . यात मोफत रक्त तपासणी तथा मोफत औषधि देण्यात आली आणि गंभीर आजार असलेल्या रुग्नाना संदर्भित करण्यात आले .
टाटा ट्रस्ट तर्फे विविध कर्करोग निदान करण्यात आले. बालरोग तदन्य डॉ तुषार भागवत यानी कुपोषित बालकांची मोफत आरोग्य तपासणी करून योग्य पोषण आहार बद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता अर्थ फाउंडेशन चे विविध गावातील आरोग्य दूत यांनी अथक परिश्रम घेतले .
https://www.suryamarathinews.com/cotton/
यामधे साहिल धोटे (तालुका आरोग्यदूत) गणेश ढगे (जिल्हा कोर्डिनेटर) तिलक पाटील ,साईनाथ मोरे, अक्षय सूर्यवंशी ,शुभम खंडाळे, सोमेश्वर भजभुजे , नामदेव नागोसे , दत्ता पेंदोर, शत्रुघन मोरे फार्मासिस्ट , नम्रता मडावी , वैभव यानी परिश्रम घेतले.