प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट : हिंगणघाट नगर परिषदेतील घंटागाडी, महिला, ट्रॅक्टर कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी करत स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
आईची ममता कशी जातीभेद विसरते हे पाहेला मिळाले! किनगाव जटुटु येथे ( cownews )
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी भेट देत आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आपण तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.
घंटागाडी कामगाराच्या प्रमुख मागण्या किमान वेतन कायदा 1948 प्रमाणे सर्व कत्राटी कर्मचारी यांना पगार देण्यात यावा, कर्मचारी भविष्य निधी योजना 1995-36, क नुसार EPF पावती देण्यात यावी, कर्मचारी भविष्य निधी योजना सुटलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव समाविष्ट करून त्या कर्मचायांना EPF नंबर देउन EPF पावती देण्यात यावी,
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कंत्राटी कर्मचारी यांना पगाराची पावती देण्यात यावी, पगाराची तारीख निश्चित करावी. कुंदन चांदुरकर यांना घंटागाडी सुपरवायजर या पदावर पूर्ववत कामावर घेण्यात यावे. या पूर्वी घंटागाडी कर्मचारी यांना कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे.
या मागण्या येत्या १५ दिवसात पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करणार असा इशारा स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन हिंगणघाट शाखेचे अध्यक्ष विक्की केशवराव सहारे यांनी संघटनेच्या वतीने दिला.
andolannews:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बालु वानखेडे, विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, सामाजिक कार्यकर्ते शाम इडपवार, शाहरुख असलम शेख, दिलीप सुनांनी, अर्जुन जुमडे, सचिन कांबळे, रमेश कांबळे, सुमित बागेश्वर ,जॉनी दुर्गे, चित्रु महानंद, रत्नकेतु दुर्गे, अब्दुल रविश रज्जाक शेख, धर्मपाल तावडे, गणेश मेसेकर, नितेश मोगरे, मयुर जांभुळकर, कैलास कोटकर, गौरव चाफळे आदी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.