आर. डी. एम ग्रुप तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा(Amravtinews)

 

Amravtinews:स्थानिक अमरावती येथील आर. डी. एम ग्रुप तर्फे दिनांक 9 मार्च रोजी योग भवन, काँग्रेस नगर येथे महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. रविराज देशमुख सर यांनी केले तर अध्यक्ष स्थान डॉ. हसीना शाह (हिम सोसायटी अध्यक्ष)यांनी भूषविले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रुपेश खडसे (विदर्भ अध्यक्ष लहुजी शक्ती सेना) यांनी महिलांची ताकद एक झाली तर जगातील कोणतीच शक्ती त्यांना हरवू शकत नाही तसेच त्यांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे.

बच्चू कडूंची अनोखी धुळवड: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ५ किमी रस्ता रंगवला(Maharashtra Political )

व महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार यासाठी मी व माझी संघटना सदैव पाठीशी राहील असे जाहीर आव्हान डॉ रुपेश खडसे यांनी केले. तसेच लाडक्या बहिणींमुळे आज मोदी सरकार व फडणवीस सरकार उभे आहे त्यासाठी त्यांनी महिलांचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाला मा. रविराज देशमुख , डॉ. रुपेश खडसे, डॉ. उमक, मा. चरणदासजी इंगोले, सौ. पूनम खडसे, सौ. अलका सरदार, सौ. पदमा पुरी, सौ. प्रज्ञा मेश्राम, सौ. कल्पना जोंधळे, बंडूभाऊ जोंधळे, लाखनवाडी फिल्म अभिनेता विजयकुमार खंडारे व नाळ फिल्म बालकलाकार श्रीनिवास पोकळे उपस्थित होते. ऑटो चालक सौ. सुप्रियाताई गजभिये यांना प्रतिभावंत महिला व समाजसेविका म्हणून सन्मानित करण्यात आले.

तसेच उपस्थित पाहुण्यांनी कार्यक्रमाच्या आयोजिका श्लेषा वानखडे व शीलाताई गायकवाड यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी त्यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

Amravtinews:चिमुकल्यांसाठी आयोजित वेशभूषा स्पर्धेत प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. सोनल सचिन मोटघरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Comment