–आदिवासी विकास उपायुक्तांचे धारणी प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र
धारणी-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत शासकीय अनुदानित आश्रमशाळेच्या 2023-24 च्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा परस्पर रद्द केल्याप्रकरणी आदिवासी विकास उपायुक्त जागृती कुमरे यांनी पुरवठा अधिकारी गिरडकर यांची विभागीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
या पत्रानुसार 2019 ते 2023 या कालावधीत झालेल्या क्रीडा स्पर्धांची सविस्तर चौकशी आणि तात्काळ अहवाल मागवण्यात आला आहे. गिरडकर यांनी कारकून म्हणून काम केल्याचे अनेक किस्से प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. मेस आणि खाद्यपदार्थ पुरवठ्याचे कंत्राट सांभाळणारी व्यक्ती त्यांच्या गाडीतून गिरडकर यांच्याकडे छोट्या भेटीसाठी जाते.
नोव्हेंबर महिन्यात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान कोणत्याही आदिवासी सामाजिक संस्थेला किंवा महिला बचत गटाला निविदा देण्यात आल्या नाहीत. स्पर्धेदरम्यान भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत बिरसा क्रांती दलाने उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांना निवेदन दिले होते.
https://www.suryamarathinews.com/crimenews-27/
एवढेच नाही तर गिरडकर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. आदिवासी विकास उपायुक्तांनी गिरडकर यांची विभागीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रकल्प कार्यालयात खळबळ उडाली असून याप्रकरणी गिरडकर यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.amravtinews