accidentnews | ट्रक गॅस टँकरची धडक;मोठा अनर्थ टळला

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी

शाम वाळस्कर

 

accidentnews: ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बालाजी पेट्रोलपंपासमोर गॅस टँकरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.मात्र सुदैवाने मोठी घटना टळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बालाजी पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी गॅस टँकरला ट्रक चालकाने जबर धडक दिली.जर या धडकेत गॅस टँकरचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

Scheme money | 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणखीन या 5 योजनेचे पैसे

या अपघाताची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखत तहसीलदार शिल्पा बोबडे,ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

 

 

accidentnews: त्यांनी अपघाताची प्रत्यक्ष पाहणी करून गॅस टँकरमधून कोणत्याच प्रकारचा गॅसचा रिसाव होत नसल्याची खात्री करून घेतली.

Leave a Comment