accident news :-
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे भरधाव खासगी बसने राष्ट्रीय महामार्गवर वडनेर भोलजी नजीक पुलाजवळ दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. पंधरा दिवसांची दिवाळीची सुटी असल्याने ते शेगाव येथे दर्शनासाठी गेले असता त्यांचा अपघात झाला असून. Crimenews
राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर वडनेरजवळ एआर ०१ ज ७७४१ क्रमांकाच्या खासगी बसने एम एच ०५ बीएस ७८२१ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. मात्र या अपघातात दुचाकीवरील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वराड येथील गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्षे), जळगाव शहरातील गिरणा कॉलनी येथील स्वप्निल भैया करणकार (वय २४ वर्षे) यांचा घटनास`थळावर मृत्यू झाला. मात्र यामध्ये कल्याण येथील रहिवासी आकाश राजू आखाडे (वय ३० वर्षे) यांचा मलकापूर येथे रूग्णालयात घेवून जाताना मृत्यू झाला. Crimenews
दोघांचे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे तर तर तिसऱ्याचे मलकापूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत नांदुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले, ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, कृष्णा नालट, आश्विन फेरण, राजू बगाडे रुग्णवाहिकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातातील मृतांना प्राथमिक आरोग्य केंद्र बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे आणले. सदर घटनास्थळी ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकर, कृष्णा नालट, अश्विन फेरण, राजु बगाडे, नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी संजय निबोळकर, विक्रम राजपूत, अनिल खंडारे, गोरानी वेरुळकार यांनी फार मदत व सहकार्य केली.accident news
स्वप्नीलचे दीड वर्षांपूर्वीच झाले लग्न मात्र
स्वप्नील करणकार याचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याला एक सहा महिन्याची मुलगी आहे. तिघेही एकाच कंपनीत कामाला होते. पुढील तपास नांदुरा पोलीस स्टेशन करत आहे accident news