_आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते आनंदाचा शिधाचे वितरण_

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम “आनंदाचा शिधा”अंतर्गत आज हिंगणघाट शहरातील स्वस्त धान्य दुकानांमधून उपक्रमांची सुरूवात आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी श्रीमती शिल्पा सोनूले,उपविभागीय अधिकारी हिंगणघाट,श्री.सतीश मासाळ, तहसीलदार हिंगणघाट, श्री.समशेर पठाण,नायब तहसीलदार हिंगणघाट, श्री.सुहास टोंग, पुरवठा निरीक्षक अधिकारी हिंगणघाट यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला *प्रातिनिधिक स्वरूपात शहरातील टिळक चौक, दत्त मंदिर वार्ड,हरी ओम मंगल कार्यालय समोरील, इंदिरा गांधी वार्ड, शास्त्री वार्ड,मुजूमदार वार्ड येथील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य किट वितरीत करण्यात आली या किट मध्ये १लिटर पाॅमोलियम तेल, १ किलो चणा डाळ,१किलो तुर डाळ,१किलो रवा देण्यात येणार असून नाममात्र फक्त १०० रूपयामध्ये हि किट राशन कार्डधारकांना मिळणार आहे हिंगणघाट शहर व ग्रामीण ५१३१४ व समुद्रपूर शहर व ग्रामीण २८३०० असे एकूण ७९६१४ कुटुंबांना लाभ मिळणार आहे सर्वसामान्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल आमदार समीरभाऊ कुणावार यांनी मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री.देवेंन्द्रजी फडणवीस यांचे आभार मानले वितरण*कार्यक्रमाला माजी नगरसेवक चंदूभाऊ मावळे,सोनू गवळी नरेश युवनाथे ,पद्मा कोडापे,देवा कुबडे, सौरभ पांडे, अनिल गहरवार,वसंत पाल, बळवंत वाघे, स्वप्निल वाघे,अनिल गहेरवार,मारूति साठे,पिता गाडेकर,धनंजय उपम,गजानन वाट आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment