बोराळे- चुचाळे येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ आरोग्य तपासणीस उपक्रमास पुन्हा सुरुवात

0
870

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत चुंचाळे येथे दि.२५ मार्च पासून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील व डॉ.स्वाती कवाडीवले यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य तपासणीस उपक्रमास पुन्हा सुरुवात झाली आहे.
कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरोघरी आशा वर्कर, शिक्षक ,अंगणवाडी सेविका यांच्या दोन टीम चुंचाळे व एक टिम बोराळे गावात जाऊन प्रत्येक घरा- घरात प्रत्येक व्यक्तीला तपासून कोरोना संशयित रुग्ण शोधून त्यांना तपासणी साठी प्रा.आ. केंद्रात पाठवीत आहे.त्याचबरोबर अँटीजन टेस्ट करणे ही सुरू आहे.
ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण निघेल त्या भागात नागरिकांची आरोग्य तपासणी व जास्तीत जास्त टेस्ट करण्याचे काम प्रा. आरोग्य केंद्र अंतर्गत करणे चालू आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही सुरू आहेच.तरी सर्वाना प्रा. आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य तपासणीसाठी आलेल्या टीमला सहकार्य करा व कोरोनाचे लक्षण असल्यास टेस्ट करून घ्या व प्रशासनाला सहकार्य करा. आपल्या गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी हातभार करा.असे आवाहन साकळी आरोग्य प्रशासनातर्के डॉ.सागर पाटील व डॉ.स्वाती कवडीवाले, बोराळे येथील ग्रामसेवक राजू तडवी, चुंचाळे येथील ग्राम सेविका प्रियंका बाविस्कर, यांनी केले आहे.
याकामी आशा स्वंयमसेविका जयश्री चौधरी,सलीमा तडवी, शिक्षक मजित तडवी, राजु सोनवणे,प्रंशात सोनवणे, अंगणवाडी सेवीका लतीका कोळी.बोराळे आशा वर्कर सुनयना राजपुत आदी परीश्रम घेत आहे.
फोटो….चुंचाळे ता.यावल येथे माझे कुंटूब माझी जबाबदारी अंतर्गत तपासणी करुण घेताना मधुकर साखर कारखाना चे संचालक नथ्थु रमजान तडवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here