ग्राम विस्तार अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोखे आंदोलन !समस्या मार्गी लावण्यासाठी नागरिकांचे आंदोलन !

0
263

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

वॉर्डातील समस्या निकाली काढण्यासाठी ‘ग्राम विकास अधिकारी यांना समस्या बाबत निवेदन देण्यासाठी मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील नागरिक व महिला गेली असता ‘ग्राम विकास अधिकारी हजर नसल्यामुळे ‘ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोख्या पद्धतीनं नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला !डोणगाव येथील वार्ड क्रमांक सहा व तीन व चार मध्ये नागरिकांना विविध समस्या ला सामोरे जावे लागत आहे ‘म्हणून वॉर्डातील नागरिकांनी .निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत गाठली ‘या निवेदनामध्ये त्यांनी असे दिले आहे की ‘जुन्या शौचालयाचे नूतनीकरण करावे ‘ग्रामपंचायत मधील रिकामे कर्मचारी पद अनुसूचित जाती मधील भरावे ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते कांचन मध्ये पर्यंतचा रस्ता मोकळा करून द्यावा !जुना पादन रस्ता मोकळा करून द्यावा ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटिकेचे काय काम झाले ‘ते निकृष्ट दर्जाचे असून ‘त्या झालेल्या कामाची चौकशी करणे व दोषींवर कारवाई करावी ‘व वार्डातील क्रमांक सहा व 3 व4 मधील समस्या तातडीने सोडवाव्यात वरिष्ठ पर्यंत जाऊन ताबडतोब काम मार्गी लावावे ।अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला ‘या निवेदनावर ‘प्रल्हाद खोडके ‘अमोल वाघमारे ।सिद्धार्थ खोडके ।आदींच्या सह्या आहेत ।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here