मोताळा प्रतिनिधी
अजहर शाह
जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून मागणी
बुलडाणा:- मागील चार दिवसां पासून वादळी, वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना दर हेक्टरी 25000 रुपयांची आर्थिक मदत मिळण्याची आग्रही मागणी प्रदेश कार्यकारीणी सदस्य मा.आमदार विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.
निवेदनात नमूद आहे की , गेल्या तिन- चार दिवसांपासून बेमोसमी वादळी वारा व गारपिटीसह झालेल्या पावसाने बुलडाणा व मोताळा तालुक्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातही शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
प्राप्त माहिती नुसार गेल्या तिन दिवसात जिल्ह्यात सरासरी 1.9 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.जिल्हयात सर्वाधिक अवकाळी पावसाचा फटका बुलडाणा तालुक्याला बसला असून तालुक्यात 8.7 मि.मि पावसाची नोंद झाली आहे.
या अवकाळी मुळे तालुक्यातील गहू, सोयाबीन, ज्वारी,बाजरी,
हरबरा,मका,भाजीपाला,कांदा,
पपई ई पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच मोताळा तालुक्यातील कोथळी,पलढग,तरोडा,लोणघाट,सहस्त्रमुळी,पून्हई,वडगांव,काबरखेड,रोहिणखेड,उबाळखेड,सारोळापीर,काळेगावं,तपोवन,मूर्ती,टाकळी,वाघजाळ,परडा,शिरवा,शेलापूर,चिंचपूर,डिडोळा,तालखेड,रिधोरा जहाँ,महाल पिंप्री,आड विहीर, अंत्री,बोराखेडी, मोताळा,कुऱ्हा,गोतमारा ई गावांत कमी जास्त प्रमाणात गहू,हरभरा,मका, भाजीपाला,कांदा टोळ यांसह केळी, टरबूज,लिंबू,पपई यांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काही पिके काढणीवर आलेली होती तर काही पिके काढून ठेवलेली होती मात्र या अवकाळी मुळे आता निसर्गाने शेतकऱ्यांवर मोठा आघात केला आहे.संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.
तरी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानी बाबत कळवून क्लेम दाखल करून
बुलडाणा ,मोताळा तालुक्यासह या अवकाळीमुळे बाधित झालेल्या पिंकांचे तात्काळ सर्वे करून मायबाप सरकारने शेतकऱ्यांना दर हेक्टरी 25000 रुपयांची तातडीची मदत करावी. अशी आग्रही मागणी विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यां कडे केली आहे.