चुंचाळे गावातील प्रसिद्ध जागृत बाबा ताजोद्दीन च्या दर्गावरील उर्स ( यात्रा )यंदा कोरोना पार्श्वभुमीवर रद्द.

 

, ,. यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

,तालुक्यातील चुंचाळे गावात येथील येथे हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणुन ओळखली जाणारी ताजोदीन बाबा आर्थात आरनीवाले बाबा यांची दर्गा ही म्हणून ओळखली जाते. येणाऱ्या १एप्रिल रोजी सालाबाद होणारी यात्रा ( उर्स ) कार्यक्रम रद्द करण्यात आले असुन , अगदी साध्या पद्धतीने लंगर ( प्रसादाचे ) कार्यक्रम होणार आहे. संपुर्ण देशावर ओढवलेल्या कोरोना विषाणु संक्रमणामुळे कार्यक्रम अगदी मर्यादित स्वरूपात असेल व कोरोना संसर्गाच्या नियमांचे परिपुर्ण पालन करुन हा कायक्रम करणार आहे. अशी माहिती चुंचाळे तालुका यावल येथील हिंदु मुस्लिम एकता समितीच्या वतीने देण्यात आली असुन , पंचक्रोशीतील बाबांच्या शेकडो भाविकांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन ही करण्यात आले आहे .
येथे दिलीप नेवे व संजुसिंग राजपूत यांच्या शेतामध्ये जवळपास नव्वद ते शंभर वर्षेपुर्वीपासुन जागृत देवस्थान ताजोदीन बाबा हे दोघं शेतांच्या बांधावर एक भले मोठे आरणीचे वृक्ष होते.तेथे ते कायम वास्तव्यात असल्यामुळे त्यांना अरणीवाले बाबा असे लोग म्हणत असत ते बाबा हे सर्वधामियांना मार्गदर्शन करत असत. संसार,प्रपंच,शेती या विषयांवर मार्गदर्शन करत.कालांतराने बाबांचा मूत्युनंतर त्यांचे थडके व दोहे शेतांच्या बांधावर होते.ते आज चुंचाळे येथील माजी सरपंच दगडु तडवी यांनी गावातील तसेच परिसरातील तडवी .हिंदू-मुस्लिम बांधवांच्या साह्याने चांगल्या प्रकारच्या दर्ग्याचे बांधकाम केले असून सर्वधमीय भाविकांच्या श्रद्धेपोटी त्या ठिकाणी मानता मानत असता.

Leave a Comment