वळती येथे जनावरांचे तपासणी व लसीकरण शिबीर संपन्न;स्वाभिमानी चा पुढाकार

 

वाढदिवसाचे औचित्य साधुन १४५जनावरांची तपासणी तर ४जनावरांची केली शस्त्र क्रीया

चिखली–स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नितिन राजपुत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेत वळती येथे जनावरांचे आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर पार पडले यावेळी गावातील व परीसरातील जनावरांचे लसीकरण तपासणी करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना सदैव शेतकरी प्रश्नावर अग्रेसर असते यापुर्वी सुद्धा स्वाभिमानी ने पुढाकार घेत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातुन गावागावात जनावर तपासण्यासाठी कटघरांचे वाटप करण्यात आले होते.दरम्याण स्वाभिमानी चे नितिन राजपुत यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन स्वाभिमानी संघटनेने पुढाकार घेत वळती येथे जनावरांचे तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.डॉ युवराज रघतवान,यांनी संजय हिंगे,सुनील डुकरे,विशाल कोथळकर,शुभम लोखंडे
गणेश काळे,यांच्या सहकार्याने एकुन १४५जनावरांचे लसीकरण व तपासणी केली आहे तर ४जनावरांची शस्त्रक्रीया देखील यावेळी करण्यात आली आहे.या जनावर तपासनी शिबिराचे आयोजन दिपक धनवे,भारत गायकवाड व विलास धनवे यांनी केले होते.यावेळी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य तथा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक,नंदकुमार तुपकर,पंचायत समिती सदस्य नासेर सौदागर,डॉ युवराज रघतवान
सरपंच प्रतिनिधी सुनील चिंचोले,ग्रामपंचायत सदस्य भारत गायकवाड,विलास धनवे,नवलसिंग सोळंकी,दिपक धनवे यांच्यासह आदिंची उपस्थीती होती.

Leave a Comment