जळगांव जा.प्रतिनिधी:-
स्थानिक जळगाव जामोद शहरातील चौभारा चौक काळपांडे हॉस्पिटल जवळील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली की सूर्यवंशी नगर येथील शुभम गजानन कपले हा तरुण नेहमी शासकीय तंत्रज्ञान माध्यमिक शाळा जुने बस स्टँड जळगाव जामोद तसेच शिकवणुकीला गुरुमाऊली ऍकॅडमी येथे जात असताना शुभम कपले हा नेहमी त्या तरुणीचा वाईट उद्देशाने पाठलाग करीत असे.सदर आरोपी शुभम कपले हा तरूणीला धमकी देत म्हणायचा की तु माझे सोबत बोलत जा.नाही बोललीस तर त्या तरुणीला व तिच्या घरच्यांना एखाद्या दिवशी चाकु मारून जिवाने मारून टाकीन अश्या प्रकारच्या धमक्या सदर आरोपी त्या तरूणीला देत असे.15 फेब्रुवारी रोजी तरुणांनी एकटि असल्याचे पाहत तरूणीच्या घरात घुसून तिचा वाईट उद्देशाने हात पकडला असता तरूणीने आरडाओरडा केल्याने सदर तरूणीचे आई वडील मोठी बहीण यांच्यासह तरूणीचा आवाज ऐकून शेजारीहि धावत आले.तेव्हा आरोपीने धमकी देत आतापर्यंत मी तुझा रस्ता अडवला व तरूणीला मारण्याच्या धमक्या दिल्या वैजापूर या कुटुंबाला अडकवतो असे म्हणून आरोपी तिथून निघुन गेला. सदर तरुणी जी समाजात बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी रिपोर्ट दिला नव्हता परंतु आरोपीने अति केल्याने जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला येऊन सदर तरुणीने तोंडे रिपोर्ट दिला आहे सदर तरुणीची फिर्याद ऐकून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३५४,३५४डी,४५२,५०६ बालकाचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ८,१२ नुसार सदर आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशन करीत आहे.