सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
आपल्या महाराष्ट्रातील अनेक संतांनी महापुरुषांनी माणुसकी जपण्याचा संदेश सर्व मानवाला दिलेला आहे ‘तसेच अनेक ठिकाणी माणुसकीचा प्रत्यय सुद्धा आलेला आहे ‘परंतु काही ठिकाणी माणुसकीचा प्रकार हा काहीतरी वेगळा घडत आहे ‘काल दिनांक 1 मार्च रोजी दैनिक भारत संग्राम चे बुलढाणा तालुक्यातील उपसंपादक ‘श्री अविनाश खिल्लारे ‘हे ४ 30 मि – काही कामानिमित्त सुंदरखेड येथून बुलढाणा शहरात येत होते ‘रस्त्याने जात असताना बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन समोर देवीच्या मंदिराच्या जवळ अचानकपणे समोरच्या ऑटो वाल्यांनी उभा केला ‘हो आता आपली मोटरसायकल त्या आठवलेंना धडकणार तोच पत्रकार खिल्लारे यांनी ब्रेक दाबले ‘त्यामुळे ते व त्यांची मोटरसायकल डाव्या बाजूला डोक्यावर ते आदळलेते खाली पडल्यानंतर अनेक बघ्यांची गर्दी जमली उन्हाळा लागल्यामुळे कोणी पाणी सुद्धा आणून दिलेली नाही आणि हा सर्व प्रकार घडला तो बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन च्या समोरच ‘काहींनी त्यांना उचलून मंदिरा मध्ये बसवले ‘व सर्वजण निघून गेले ‘त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे आपल्यासोबत काय झाले काय नाही हे त्यांना कळले नाही ‘आणि त्यामुळेच बघ्यांपैकी त्यातील काही चोरट्यांनी मोटर सायकल जवळ पडलेली त्यांचे पाकीट अलगद उचलून नेले ‘त्यामध्ये त्यांचे पैसे आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम कार्ड असे महत्वाची कागदपत्रे होती ‘थोड्यावेळातच सिनखेडराजा चे प्रतिनिधी सचिन खंडारे तिथे पोहोचले सर्व हकीकत बघितली नंतर आणि पाकीट याचा बराच वेळ आसपास शोध घेतला परंतु पाकीट कुठेच आढळून आले नाही ‘पैसे देणार यांनी दिले तरी चालतील परंतु पाकिटात असणारे महत्त्वाचे कागद तर परत द्यायला हवी होती हाच प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो की बुलढाण्याचा रस्त्यावर माणुसकी हरवली आहे काय . ? एखाद्या अपघातग्रस्तांना वाचवण्याचे सोडून गर्दी बघून काही चोरटे मात्र चोरी चा फायदा घेतात ‘त्यामुळे माणुसकीची गोष्ट शिल्लक तरी आहे काय हा प्रश्न निर्माण होतो ‘