गजानन सोनटक्के जळगाव जामोद
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे चार मार्च रोजी असलेला आवजी सिद्ध महाराज भंडारा महोत्सव यावर्षी कोरोणा रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे रद्द झाला आहे सुनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराज यांचा भंडारा महोत्सव चार मार्च रोजी होणार होता परंतु या वर्षी कोरोणाच्या वाढत्या प्रभावामुळे संस्थांचे अध्यक्ष तथा संचालक मंडळाच्या वतीने महोत्सव रद्द करण्याचे ठरले आहे सूनगाव येथील नागरिकांचे ग्रामदैवत व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आवजी सिद्ध महाराज यांचा भंडारा जणू काही सून गाव येथे दिवाळीच आहे या प्रमाणे साजरा केला जातो गावातील बाहेरगावी असणारे फक्त जे की दिवाळीला ही आपल्या घरी येत नाही ते या भंडाऱ्याला सुट्टी काढून येत असतात व परिसरातील भाविक भक्त या भंडारयासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात या भंडार्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे महाप्रसाद म्हणून उडदाची डाळ व ज्वारीची भाकरी असा असतो परंतु या वर्षी जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे व कोरणा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे येथील विश्वस्त मंडळ यांनी भंडारा महोत्सव रद्द करण्याचे ठरविले आहे तरी आवजीसिद्ध महाराज संस्थान चे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ अंबडकार व सचिव प्रवीण धर्मे यांनी परिसरातील भक्तांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करू नये असे आवाहन केले आहे