,यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे ,
तालुक्यातील किनगाव गावाजवळ अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्या डंपर व एका कारद्वारे कारवाई करणाऱ्या महसुल पथकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली असुन , तालुक्यात महसुल वरील पथकावर हल्ला करण्याची ही दुसरी घटना असुन , या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे . दरम्यान या घटने बाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की दिनांक २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ , ४० वाजेच्या सुमारास किनगाव येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी सचिन तुळाशीराम जगताप किनगाव तलाठी टेमरसिंग छतरसिंग बारेला , विलास भिकाजी नागरे , राजु काशीनाथ घोरटे, गणेश रमेश वऱ्हाडे , विजय साळवे , निखील वैजनाथ मिसाळ या पथकासह तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये आपले कर्तव्य बजावत असतांना जळगाव हुन किनगावच्या दिशेने येणारे डंपर वाहन क्रमांक एमएच १२ एफ झेड८४ २५या वाहनास चौकशी कामी थांबविण्याचे प्रयत्न केले असता सदर डंपर चालकाने वाहन न थांबवा सरळ वाहन हे किनगाव गावात नेले आम्ही आमच्याकडील वाहनाने त्यांचा पाठलाग केला असता सदरचे डंपर हे गावातील मस्जिद जवळ गर्दीच्या ठिकाणी थांबले असता आम्ही डंपर चालकास त्याचे नांव विचारले असता त्यांने आपले नाव गपेश संजय कोळी रा . कोळन्हावी ता यावल असे सांगीतले , याच वेळी त्या ठीकाणी टाटा इंडीका ही मोटर वाहनक्रमांक एमएच १९ एपी४१२८ही आली व यातील गोपाळ प्रल्हाद सोळुंखे, संदीप आधार सोळुंखे , छगन कोळी व गोपाळ कोळी हे त्यात बसले होते यातील गोपाळ कोळी हा गाडीतुन उतरल्यावर त्यांने मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्याशी हुज्जत घातुन तुम्हाला डंपर पकडण्याचा अधिकारी नाही असे बोलुन वाद घातला व शासकीय कामात अडथळा निर्माण करून मंडळ अधिकारी यांना धक्काबुकी करून छातीवर बुक्का मारला यानंतर गावातील मंडळीची वाढती संख्या पाहुन टाटा कार घेवुन त्यांनी पळ काढला , त्यानंतर पंचनामा करून सदरचे डंपर यावल कडे आणत असतांना पुन्हा डंपर चालकाने वाहन साकळी जवळच्या भोनक नदीच्या दिशेने पळविण्याचा प्रयत्न केला असता सदर कारही चालक गोपाळ प्रल्हाद सोळुंखे यांने महसुल पथक हे कारवाई करीत असतांना कार त्या पथकाच्या दिशेने वेगाने आणुन अधिकारी यांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . या बाबत यावल पोलीसात संशयीत आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, अवैद्य गौण खनिज विनापरवाना वाहतुक करणारे डंपर व टाटा कार यांना जप्त करण्यात आले आहे .