सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथील शवविच्छेदन केंद्र डॉक्टरांच्या व साहित्याच्या अभावी गेल्या पंधरा वर्षांपासून धूळ खात पडलेले आहे,साखरखेरडा हे सर्वात मोठे गाव असल्यामुळे परिसरातील ५२ खेडे या गावची जोडलेले आहेत,साखरखेर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ‘अनेक लोक उपचारासाठी साखरखेर्डा येथे दवाखान्यामध्ये येत असतात .परंतु एखांदा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन करावयाचे असल्यास सिंदखेड राजा येथे न्यावे लागते .त्यामुळे नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो व आर्थिक भुर्दंड पडतो,कारण साखरखेर्डा ते सिंदखेडराजा हे ७० किलोमीटर अंतर असून,लवकर नंबर लागत नसल्यामुळे तासन तास सिंदखेडराजा येथे शवविच्छेदन केंद्रावर ताटकळत बसावे लागते,कधी तर शवविच्छेदन केंद्रावर नातेवाईकाचे व डॉक्टरचे वाद सुद्धा झालेले आहे,व वादाचे रूपांतर मारहाणीत सुद्धा झालेली आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो,म्हणून शवविच्छेदन करताना प्रेताची विटंबना झाल्या सारखीच आहे ‘म्हणून साखरखेर्डा येथील गेल्या पंधरा वर्षापासून शवविच्छेदन केंद्राची इमारत धूळखात पडलेली आहे,शवविच्छेदन केंद्राची इमारत बांधून पूर्ण तयार आहे परंतु डॉक्टर व साहित्याच्या अभावी अजूनही शवविच्छेदन केंद्र सुरू झालेले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल, सिंखेडराजा मतदारसंघाचे आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी या घटनेकडे लक्ष देऊन शवविच्छेदन सुरू करावे अशी मागणी नागरिकानी केली आहे,त्यामुळे साखरखेर्डा परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळेल, — – – -(गेल्या पंधरा वर्षापासून शवविच्छेदन केंद्र सुरू झाले नसून हे केंद्र सुरू झाली तर परिसरातील नागरिकांना याचा लाभ मिळेल व वादविवाद होणार नाहीत हे केंद्र लवकरात लवकर सुरू करावे यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू – – -राजू ठोके माजी पंचायत समिती सभापती साखरखेर्डा )
– …हे केंद्र लवकरात लवकर सुरू करावे यासाठी आपण पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत . – …सय्यद रफिक ग्रामपंचायत सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार साखरखेर्डा ‘