यावल भुसावळ रोडवर ट्रॅक्टर मोटरसायकलचा भिषण अपघात दुचाकीस्वार जागीच ठार

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे ,

यावल तालुक्यातील अंजाळे घाटात सायंकाळी ट्रॅक्टर व दुचाकी मोटरसायकलच्या झालेल्या भिषण अपघातात एक व्यक्ति जागीच मरण पावल्याची घटना घडली असुन या संदर्भात पोलीसात ट्रॅक्टर चालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की भालशिव तालुका यावल येथील राहणारे प्रदीप चावदस तायडे २९ वर्ष हे दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भुसावळकडुन भालशिव या आपल्या गावी दुचाकी वाहन क्रमांक एमएच १९डीएम९४२९या वाहनाने जात असतांना भुसावळ रोडवरील अंजाळे घाटात समोर येणाऱ्या ट्रक्टर क्रमांक एमएच १९पी२९५३वरील चालक ज्ञानेश्वर शिवराम कोळी राहणार चोरवड तालुका रावेर यांने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता समोरून येणाऱ्या प्रदीप चावदस तायडे हा ट्रॅक्टरखाली चेंगरला गंभीर जख्मी होवुन जावुन जागीच मरण पावला आहे . याबाबत शांताराम चावदस तायडे रा भालशिव यांनी फिर्याद दिल्याने वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अजमल पठान हे करीत आहे .दरम्यान मयत प्रदीप तायडे याचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले .

Leave a Comment