शिंदी येथील अपंग समाधान ने मिळवला बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक !महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईवर अपंग समाधानने फडकवला तिरंगा ।

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील एका पायाने अपंग असलेला समाधान रमेश बंगाळे या 24 वर्षीय तरुणाने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई हे शिखर सहजरित्या पार करीत 26 जानेवारीला शिखरावर तिरंगा फडकवला !यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून अपंग समाधान चे भरभरून कौतुक होत आहे !शिवूर्जा प्रतिष्ठान औरंगाबाद संस्थेच्यावतीने व संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी अपंगासाठी ही मोहीम आयोजित केली होती आणि त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव समाधान बंगाळे हा अपंग तरून सहभागी होता !26 जानेवारी ला संपूर्ण भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण सुरू असताना इकडे अपंग समाधान सकाळी ५३० वाजता शिखर चढण्यास सुरुवात केली आणि सकाळी 10.30 वाजता तो शिखराच्या माथ्यावर पोहोचला ! ६ तासाचा खडतर प्रवास करत समाधान व त्यांच्या अपंग सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर त्यांची उंची १६४६ मीटर आहेहे सर करुन माथ्यावरती भारत देशाचा तिरंगा डौलाने फडकला !यामुळे समाधान बंगाळे यांना प्रशस्तीपत्र व गोल्ड मेडल देऊन संस्थेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला ‘शिंदी सारख्या खेडेगावातून येऊन बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक मिळाल्यामुळे समाधान वर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे ‘

Leave a Comment