गोंदिया-शैलेश राजनकर
गोंदिया, दिनांक – 30 जानेवारी 2021 – मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी पो. स्टे. हद्दीतील अवैद्य धंदे समुळ नष्ट करणे या उद्देशाने ऑपरेशन क्रॅकडाऊन मोहिम राबविणे चे आदेशित झाल्याने दिनांक ३०/०१/२०२१ रोजी गुप्त बातमीदांरा कडून सपोनि अजित कदम ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी यांना माहीती प्राप्त झाली की, छत्तीसगड वरुन नागपुरकडे चिचगड मार्गाने ट्रक क्र. सिजी १५ ए – ७४१७ अवैधरित्या प्राण्यांची वाहतुक होत आहे.
अशी खबर प्राप्त होताच वरिष्ठांना माहिती देवुन व मा. पोलीस अधिक्षक गोदिया, मा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनात पो,उ,प,नि उरकुडे व पो.स्टे. स्टॉपसह चिचगड पॉईन्ट येथे नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदी दरम्यान वरील क्र. चे ट्रक क्र. सिजी १५ ए -७४१७ यास थांबविण्यचा प्रयत्न केले असता सदर ट्रक चालकांनी ट्रक न थांबवता सदरचा ट्रक आमगांव रोडनी वळवल्याने आम्ही सपोनि अजित कदम व पो.स्टे. स्टॉपसह ट्रक
चा पाठलाग करुन मौजा लोहारा येथे सदर ट्रक ला अडवुन ताब्यात घेतला.
सदर वाहनाचा वाहन चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने आपले नाव मोहम्मद नसीम मोहम्मद यासीम अंसारी वय -३० वर्ष रा. प्लॉट क्र. १०९ हमीदर नगर, नागपुर असे सांगीतले. सदर वाहनाची पाहणी केली असता, त्यामध्ये लाल, काळ्या, पांढ-या रंगाचे एकुण ३३ गोवंश जातीचे जनावरे प्रती नग किंमती ५०००/ -रु. प्रमाणे एकुण १,६५०००/ -रु. २) टाटा कंपनीचा ट्रक किंमती १०,०००००/- रु. असा एकुण ११,६५,०००/ -रु. चा माल
वाहतुक बिना परवाना दाटी वाटीने जनावरे कोंबुन निर्दयतेने व निष्ठुरतेने वागणुक देवुन चारापाण्याची सोय न करता व वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त न करता वाहतुक करीत असतांनी मिळुन आल्याने पोलीस स्टेशन देवरी येथे अप क्र. २३/२०२१ कलम ११ (१,) (ड)
प्रा.नि.वा.का .१९६० सहकलम, ५ (अ), ९ म.रा. प्राणि संरक्षण कायदा सन -१ ९९५ सह कलम १८४, मो.वा.का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि उरकुडे पोस्टे देवरी हे करीत आहेत.