पाचवी ते आठवी पर्यंत शाळा सुरू . साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना स्टेस , सर्व निगेटिव्ह

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
जिल्हा परिषद आणि माध्यमीक शाळा मधील पाचवी ते आठवी पर्यंत चे वर्ग सुरु करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिल्यानंतर प्रत्येक शिक्षकांची कोरोना स्टेस सुरु आहे . साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना स्टेस करण्यात आली असता सर्व शिक्षकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत . अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संदिप सुरुशे यांनी दिली .
महाराष्ट्र शासनाने दिवाळी नंतर ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु केले होते . ते वर्ग सुरु करतांना पालकांची सहमती आवश्यक ठेवण्यात आली होती . त्यावेळी प्रथम दोन टप्प्यांत वर्ग भरविण्यात आले होते . परंतू सुरवातीला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला नाही . केवळ १० टक्के उपस्थिती होती . त्यानंतर मात्र उपस्थिती वाढली .आणि विद्यार्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला . कोरोना संक्रमणाची भिती दुर सारत सोशल डिस्टनचे अंतर राखून आणि तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून विद्यार्थी आले . शाळांमध्ये सेनिटाझरचा वापर करण्यात आला . दररोज तपासणी करण्यात आली . त्यामूळे साखरखेर्डा , शेंदुर्जन मलकापूर पांग्रा येथील शाळेत एकही विद्यार्थी कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आला नाही . शिक्षक आणि संस्था चालक यांनी घेतलेली खबरदारी उपयोगी आली . तोच धागा धरुन पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून प्रथम पाचवी ते आठवी पर्यंत शिकवीणीचे कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा मधील साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत असलेल्या साखरखेर्डा , सवडद , मोहाडी , राताळी , तांदूळवाडी , दरेगाव , शेंदुर्जन , शिंदी , पिंपळगाव सोनारा , सावंगी भगत , गुंज , वरोडी , राजेगाव , सायाळा , लिंगा , जागदरी , जनुना तांडा , बाळसमुद्र , गोरेगाव , उमनगाव , पांग्रीकाटे ,राताळी या २२ गावातील २५० शिक्षकांची कोरोना स्टेस करण्यात आली . या स्पेस मध्ये सर्व शिक्षक निगेटिव्ह आले आहेत .
——————————————————–
सर्व शिक्षक निगेटिव्ह आले असले तरी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवितांना तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून शाळेत पाठवावे . कोरोना संसर्गजन्य आजार कमी झाला असला तरी भिती कायम आहे .
डॉ संदिप सुरुशे
वैद्यकीय अधिकारी , प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेर्डा

Leave a Comment