आडगावराजा येथे १ फेब्रुवारी पासुन श्रामणेर शिबीराचे आयोजन

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

अखिल भारतीय भिक्खु संघव तक्षशिला बुद्धविहार स्मारक समितीच्या वतीने आडगावराजा येथे दिनांक १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या दरम्यान भव्य श्रामणेर शिबीर व बौद्ध धम्म परीषदेच्या आयोजन करण्यात आले आहे.
तुझा वारसा पुढे न्यावया , करु जिवाचे रान भिम बा आम्ही तुझी संतान या प्रमाणे
परीसरातील सर्व श्रद्धा शिल शिल संपन्न सदाचारी बौद्ध ऊपासक उपासीका यांना आवाहन करण्यात येते की, प.पु.बोधीसत्व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या धम्माचा प्रचार आणी प्रसार व्हावा दृष्टिकोन समोर ठेऊन व मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पुज्य भदन्त गुणरत्नजी महाथेरो जेतवन महाबुद्ध विहार नंदुरबार
यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय भिक्खु संघ व तक्षशिला बुद्ध विहार स्मारक समिती आडगावराजा जि.बुलढाणा यांचे विद्यमाने भव्य श्रामणेर शिबीर व बौद्ध धम्म परीषद रामभाऊ कहाळे नगर आडगावराजा सोनोषी रोड – आडगावराजा येथे आयोजित करण्यात आली आहे तरी
श्रामणेर शिबीर वेळापञक
दिनांक १-०२-२०२१
ते ७–०२-२०२१ पर्यत
श्रामणेर शिबीरात सहभागी होण्यासाठी ५०० री फी राहिल या शिबीरात जास्तीत जास्त संख्येने हजर राहुन सहभागी होण्याचे आवाहन
एकनाथ कहाळे
902439524 -7798208837,
रमेश शिंदे -8766986113 बुद्धभुषण कहाळे
7822819455 यांनी तथा श्रामणेर संघ आडगावराजा यांनी केले आहे

Leave a Comment