शिक्षक गजानन खंडारे यांचे अमरावती शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू !

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथीलय शवंतराव चव्हाण माध्यमिक व स्वर्गीय भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालय राजेगाव येथील शाळेवर कार्यरत शिक्षक गजानन संपतराव खंडारे.

राहणार शेंदुर्जन यांचे शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी तसेच नियमबाह्य केलेली भरती प्रक्रिया तसेच ‘शाळेतील मुख्याध्यापकावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल.

असताना सुद्धा तसेच मुख्याध्यापक यांचे वेतन थकित वेतन सह पूर्ववत सुरू करण्यासाठी दिलेला अमरावती शिक्षण उपसंचालक यांनी आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा.

तसेच संस्थाचालक आरोपी असताना व त्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा अमरावती उपसंचालक यांच्या कार्यालयाने बारावी विज्ञान शाखा सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी.

 

 

एक क्लिक करून पहा

https://www.suryamarathinews.com/post/8285

 

या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीस कडक शासन करावे या मागणीसाठी 26 जानेवारी पासून श्री गजानन खंडारे हे आपल्या दोन लहान मुलं पत्नी यांच्यासह अमरावती शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत.

तरी जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार यावेळी शिक्षक श्री गजानन खंडारे यांनी व्यक्त केला आहे .

अमरावती येथील शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर असलेल्या उपोषणास यावेळी पत्रकार सचिन खंडारे येथील सामाजिक कार्यकर्ते बबन सरकटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल मोरे तसेच हिवरा आश्रम येथील गजानन मोरे यांनी भेट दिली !

Leave a Comment