सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि याच जयंती निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विविध कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करत असतात ‘असेच सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदे या गावी सावित्रीबाई फुले व महिला शिक्षक दिन याचे औचित्य साधून शिंदी येथील पत्रकार सचिन खंडारे व अजय खंडागळे यांनी महिलासाठी मोफत उद्योग कार्यशाळा आयोजित केली होती ‘या कार्यशाळेमध्ये बचत गटाच्या महिला तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण उपस्थित होते ‘यावेळी सर्वप्रथम शिंदी गावचे ग्रामसेवक अर्जुन गवई तसेच सरपंच विनोद खरात मुंगसाजी अर्बन शाखा अधिकारी नितीन डाखोरे महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती विनोद मार्के यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले .यानंतर उपस्थित असलेले ग्रामसेवक अर्जुन गवई यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व महिलांच्या बचत गटाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहील अशी ग्वाही दिली !यानंतर सरपंच विनोद खरात तसेच मुंगसाजी अर्बन शाखा अधिकारी नितीन डाखोरे यांचे सुद्धा थोडक्यात भाषणे झाली .त्यानंतर उद्योग कार्यशाळेचे मार्गदर्शक अविनाश खिल्लारे व तसेच उमेश खारडे यांनी उद्योगा बाबत मार्गदर्शन केले तसेच कोणते उद्योग महिलांच्या फायद्यासाठी आहेत कोणते उद्योग महिलांच्या तोट्या साठी आहेत याचे सविस्तर मांडणी त्यांनी या वेळी केली ‘त्यानंतर कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर प्रमुख पाहुणे असलेले मुंगसाची सरपंच शाखाधिकारी नितीन डाखोरे सरपंच विनोद खरात तसेच अकोला येथील तरुण उद्योजक मयूर घुसरकर ।मेहकर चे सचिन जोशी ‘यांच्या हस्ते उपस्थित कार्यशाळेतील महिलांना व तरुणांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले ‘यावेळी महिलांसाठी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती ‘कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन पवन गवई यांनी केले ‘कार्यक्रम यशस्वीतेसाठी ‘महिला बचत गटाच्या स्वाती विनोद मारके ‘शुभम खंडारे रतन खंडारे अजय खंडागळे ‘गजानन गवई ‘संतोष बंगाळे ‘सुनील वायाळ ‘विजय भालेकर ‘प्रवीण मोरे ‘सुरेश यरमुले ‘आदींनी परिश्रम घेतले ‘