महिला शिक्षक दिनी’ महिला शिक्षकांचा सत्कार करून गौरव करण्यात येणार -ओबीसी मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष दशरथ बनकर यांचे वक्तव्य

0
446

 

प्रतिनिधी
ऋषी जुंधारे

वैजापुर ता. 2-महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे. देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई यांनी स्वतः शिक्षण घेऊन महिलांना शिकवण्याचे काम केले. स्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम फुले दाम्पत्याने केलंय. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन स्वीकारतानाच ही मागणी मान्य केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतानाच छगन भुजबळ म्हणाले की स्रियांना ‘चूल आणि मूल’ या परंपरेतील चार भिंतीच्या पलीकडे आणण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले आहे. त्या काळात सामाजिक बहिष्कार स्वीकारून प्रसंगी शेण व दगडधोंड्यांचा मार सहन करत त्यांनी मुलींना शिकवण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा देशभरात ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन आता केंद्र शासनाकडे याबाबत मागणी करणार आहे. दरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात उद्या वैजापुर येथील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ या शिक्षकदिनानिमीत्त मा. नगराध्यक्षा शिल्पाताई दिनेशसिंग परदेशी याच्या हस्ते महिला शिक्षिकांचा सत्कार करून गौरव करण्यात येणार असल्याचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष दशरथ बनकर यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here