प.हं.तेजस्वी महाराज जन्मोत्सव भाविक भक्तांच्या विनाच साजरा. घरपोच प्रसाद वाटणारे वरोडी हे महाराष्ट्रातील पहिलेच देवस्थान

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

वरोडी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे दरवर्षी मार्गशीष दुर्गाष्टमी ला परमहंस श्री तेजस्वी महाराज जन्मोत्सव सोहळा अगदी थाटामाटात व दिमाखात लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत असतो, परंतु यावर्षी कोरोना महामारी च्या संकटामुळे हा जन्मोत्सव सोहळा शासन नियमानुसार विधिवत पूजन करून पार पाडण्यात आला. भागवत सप्ताह मध्ये भागवत कथा हरिभक्त परायण प्रकाश महाराज मगर यांच्या अमृततुल्य वाणीतुन श्रोत्यांनी श्रवण केली. तसेच हा जन्मोत्सव सोहळ्यासाठी संस्थांनी भाविकांना नम्र आवाहन केले होते की, आपण जिथे आहात तेथूनच तेजस्वी महाराज यांच्या फोटो मांडून पूजन करावे. त्याप्रमाणे भाविकांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची गर्दी न करता मोठ्या श्रद्धेने घरूनच जन्मोत्सव साजरा केला. दरवर्षी लाखो भाविकांच्या मांदियाळीत तब्बल १०१ क्विंटल पुरी भाजी चा महाप्रसाद भाविकांना वितरित केल्या जात असतो. जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भावी भक्त वरोडी येथे येऊन साक्षात परब्रम्ह गजानन महाराज रुपी श्री तेजस्वी अवलिया चे दर्शन घेऊन तृप्त होत असतात. परंतु यावर्षी कोरोना चे सावट सर्वत्र पसरलेले असताना सावधगिरी म्हणून भाविकांच्या श्रद्धेपोटी तब्बल साडेचारशे हून अधिक गावांमध्ये घरोघरी प्रसाद रुपी लाडू वाटप करण्यात आले. घरपोच प्रसाद देणारे महाराष्ट्रातील पहिलीच देवस्थान म्हणजे श्री तेजस्वी महाराज संस्थान होय.प्रसाद वाटपाचे काम हे जवळपास १०० हून अधिक स्वयंसेवकांनी अविरतपणे पाच ते सहा दिवस मेहनत घेऊन भाविकांत पर्यंत पोहोचला. या सर्व कार्यासाठी संस्थानचे अध्यक्ष, व पदाधिकारी मंडळी, स्वयंसेवक, पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी मेहनत घेतली आहे ‘

Leave a Comment