प्रतिनिधी- सचिन पगारे
नांदगाव (नाशिक)
कासारी येथे स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त येथील सामाजिक कार्यकर्ते नंदलाल इप्पर यांच्या वतीने व मालेगाव ब्लड बँकच्या सौजन्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले .
नांदगांव तालुक्यातील कासारी येथे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त स्व. गोपीनाथराव मुंडे सोशल फाउंडेशन कासारी व सामाजिक कार्यकर्ते नंदलाल इप्पर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर तसेच गरजूंना ब्लँकेट वाटप आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडखे ,नांदगांव तालूका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष डॉ. जनार्दन पगार, उपाध्यक्ष नंदलाल इप्पर, प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मालेगाव ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले.यावेळी मच्छिंद्र घूगे, ईश्वर जाधव, शेषराव गायकवाड, आशितोष हटकर, भिका गवळी, संतोष इप्पर, जनार्दन भागवत, चंद्रभान झोडगे, रविकांत भागवत,गणेश बागूल,समाधान शेरेकर, अशोक शिंदे, राजू इप्पर आदी उपस्थित होते.