साखरखेर्डा येथे 25 घाटाचे उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावी याबाबत – – – … : रवींद्र मगर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथे 25 खाटाचे उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करावी अशा मागण्याचे निवेदन साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे !त्यांनी पाठवलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की,साखरखेर्डा हे मोठे शहर असून साखरखेर्डा लागत 50 ते 55 खेडे जोडलेली आहे विविध आजाराच्या उपचारासाठी लोक साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल होत असतातपरंतु साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मुबलक जागा आहे !गंभीर आजार झाला की लोकांना शासकीय अथवा खासगी दवाखान्यांमध्ये जावे लागत आहे ।किंबहुना ‘अकोला औरंगाबाद बुलढाणा अशा मोठ्या शहरांमध्ये लोक गंभीर आजाराच्या उपचारासाठी जातात ‘त्यामुळे लोकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे !तरी गंभीर आजाराच्या स्वरूपातील रुग्णावर तात्काळ उपचार मिळावे वनस्पतीच्या खेडेगावातील गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी 25 घाटाचे उपजिल्हा रुग्णालय त्वरित मंजूर करण्यात यावे अशी मागणीही यावेळी रवींद्र मगर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे !

Leave a Comment