पंजाब -हरियाणा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदगाव प्रहार संघटनेकडून रास्तारोको आंदोलनाचे तहसीलदारांना निवेदन

प्रतिनिधी- सचिन पगारे
नांदगांव नाशिक

दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रहार शेतकरी संघटना व प्रहार जनशक्तीमार्फत नांदगांव येथे रास्ता रोको आंदोलना बाबत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
कृषी कायद्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या पंजाब -हरियाणा येथील शेतकर्‍यांसह देशातील लाखो शेतकरी सहभागी झाले असून केंद्र सरकारने या शेतकर्‍यांसोबत अजूनही चर्चा केलेली नाही. याउलट या आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवर हिंसाचार करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे.सदर शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ व शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात दि.४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नांदगांव येथे रस्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .नांदगांव तालूका प्रहार शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षामार्फत तहसीलदार उदय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. याठिकाणी नांदगाव प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, तालूका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालूका अध्यक्ष डॉ.जनार्दन पगार, तालूका उपाध्यक्ष नंदलाल इप्पर , उप तालुकाध्यक्ष राहूल आहेर ,नांदगाव उपतालूका प्रमुख गोकुळ थोडे, मनमाड प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष दत्तू कांतीलाल कातकडे, अतुल इप्पर, राहुल आहेर, प्रदिप आहेर, गणेश इप्पर, जातेगांव शाखा संघटक ईश्वर जाधव, शाखाध्यक्ष जनार्दन भागवत, उपाध्यक्ष चंद्रभान झोडगे,नारायणशेठ सोनवणे, निवृत्ती सोनवणे,राहूल पवार रविकांत भागवत, वैभव शिंदे, नंदू खिरडकर, सद्दाम शेख , किरण पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment