साखरखेर्डा (प्रतिनिधी )
चिखली तालुक्यातील उंद्री येथेसेंट्रल बँक ऑफ इंडिया व भारत सरकारच्या वतीने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व ग्रामपंचायत उंद्री यांच्या सहकार्यातून उंद्री गावातील 25 ते 45 वयोगटातील महिला बचत गटांच्या ३५ महिलांना दि . 1डिसेंबर रोजी गावातील जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये ‘विविध विषयांमध्ये सहा दिवस प्रशिक्षण देण्यात आले !या प्रशिक्षणामध्ये चहापान भोजन साहित्य व व्यवसाय उद्योग यासह बँकिंग योगासने खेळ आधीचे नि: शुक्ल पणे प्रशिक्षण दिल्या गेले ।तसेच महिलांना उंद्री गावचे सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांच्या हस्ते प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्र चे वितरण करण्यात आले ‘यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून . आर सेट आय चे संचालक दिलीप ठाकूर हे उपस्थित होते .या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीप्रशिक्षक अमोल गवळी ग्राम विकास अधिकारी दीपक गिऱ्हे सी आर पी ) ज्ञानेश्वरी जगताप यांनी अथक परिश्रम घेतले !