संग्रामपूर तालुक्यात  किडनीच्या  आजाराने  आणखी एक बळी ….. 1 महिन्याच्या आत सहावे मृत्यु;मृत्यूचे तांडव सुरुच …

 

बुलडाणा – संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथील ५० वर्षीय शेतकऱ्यांचा किडनीचे आजाराने दि. २७ नोव्हेबर रोजी मृत्यु झाला. संग्रामपूर तालुक्यात २५ दिवसात किडणी आजाराचा हा पाचवा मृत्यु आहे,त्यामुळे तालुक्यात ह्या रुग्णामध्ये व कुटुंबात  भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  किडन्या निकामी झाल्या होत्या त्यामुळे त्यांचेवर गेल्या काही वर्षापासून उपचार सुरु होते.मागील तीन आठवड्यात तालुक्यात चौघांचा  मृत्यु झाला तर निवाणा येथील शेतकरी प्रल्हाद कोरडे  हे  किडनीचे पाचवे  रुग्ण आहेत.
संग्रामपूर तालुका हा पिण्याचे पाण्यासाठी क्षारयुक्त असल्याने हा तालुका खारपाण पट्टा  समजल्या जातो. गेल्या दहा वर्षापुर्वी किडणीच्या आजाराने अनेक रुग्ण आहेत.त्यांचेवर अजुनही उपचार सुरु आहेत.नवीन रुग्ण कमी असले तरी जुने रुग्णांची संख्या जास्त आहे.आणी त्यांचे मृत्युचे प्रमाण वाढत आहे. दि.३ नोव्हेंबर व दि.४ नोव्हेंबर रोजी संग्रामपूर शहरातील दोन दिवसात दोन मृत्यु तर दि.५ नोव्हेंबर रोजी वानखेड येथील एक आणी  दि.२५ रोजी वरवट बकाल येथील शे.मेहबुब शे.बशीर यांचा अकोला येथे  मृत्यु झाला असून दि.२७ नोव्हेंबर  रोजी निवाणा येथील  प्रल्हाद ज्ञानदेव कोरडे यांचा  मृत्यु झाला आहे. त्यांचे पश्चात  आई , पत्नी  ,एक मुलगा ,२ मुली असुन त्यातील एक मुलगी अंध अपंग आहे तिन्हीही अपत्य  अविवाहित आहेत.वरील सहा किडनीग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वरवट बकाल येथे डायलीसिसची  व्यवस्था असून ती नावालाच आहे. शेगाव येथे  आहे तर तेथेही तज्ञ डाॕक्टरांची कमतरता असल्याचे समजते. माजी मंत्री तथा वि.आमदार डाॕ.संजय कुटे यांनी यापुर्वी खुप दखल घेतली आहे.तरी ह्या बाबीकडे शासनाने ठोस उपाय योजना करुन लक्ष देण्याची गरज आहे अशी नागरिकांची मागणी आहे.

Leave a Comment