(सूर्या मराठी न्युज ब्युरो)
बापानेच पोरांना चोरीची तालिम दिली अन् त्यांनी मग स्विफ्ट कार चोरी करण्याचा सपाटाच लावला होता राज्यातील अनेक जिल्ह्यात त्यांनी कार चोरी केल्या ते चोरी केलेल्या कार बुलडाणा जिल्ह्यात आणायचे . या कारच्या नंबरप्लेट बदलायचे आणि मग या कार परराज्यांत विकायचे असा त्यांचा उधोग गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता मात्र देऊळगाव राजाचे महेश भोसले कन्नड ( औरंगाबाद ) येथे मावशीकडे गेले होते . तिथे त्यांची व त्यांच्या मावसभावाची कार चोरीला गेली व त्यांनी याची तक्रार दाखल केली अन् आपल्याच जिल्ह्यातल्या माणसाने या भामट्यांची आजवरची कारकीर्द संपवली . त्यांच्या चोऱ्यांचा पर्दाफाश झाला ते अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले ,
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार कन्नडमध्ये दोन कार चोरीच्या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळास भेट देली . घटनास्थळाचे आसपासचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली . त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की , हा गुन्हा शेख दाऊद शेख मंजूर ( रा . धाड , जि . बुलडाणा ) याने त्याच्या मुलांच्या मदतीने केला आहे . त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळ न दवडता तातडीने चिखली ( जि . बुलडाणा ) गाठले . चोरटे बापलेक रोहिदासनगर ( चिखली ) येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्या भागात छापा मारला आणि शेख दाऊद शेख मंजूर ( 55 , रा . धाड जि.बुलढाणा ) , त्यांचा मुलगा शेख नदीम शेख दाऊद ( 22 , रा . धाड , ह.मु. देऊळगावराजा जि . बुलडाणा ) , दुसरा मुलगा शेख जिशान शेख दाऊद ( 28 , रा . धाड , ह.मु. घाटनांद्रा ता . जि . बुलडाणा यांना ताब्यात घेतले . या बापलेकांचे साथीदारही इथेच मिळून आले . सखाराम भानुदास मोरे ( 31 ) व दीपक दिगंबर मोरे ( 20 , दोघे रा . निरखेडा , ता.जि.जालना ) यांनाही ताब्यात घेण्यात आले . त्यांच्या कसून चौकशीत त्यांनी कन्नड येथून दोन्ही स्विफ्ट कार चोरल्याची कबुली दिली . नंबर प्लेट बदलल्याची कबुलीही त्यांनी दिली मराठवाडा सेलू ( जि . परभणी ) येथून एक स्विफ्ट कार ऑक्टोबरमध्ये चोरून आणल्याची कबुलीही बापलेकांनी दिली आहे . याशिवाय कन्नड येथून चोरलेली एक स्विफ्ट कार त्यांनी बनावट नंबर प्लेट लावून कुंभारवाडा ( चिखली ता . चिखली ) येथे लावून ठेवली होती . त्यांच्या ताब्यातून 3 स्विफ्ट कार , एक होंडा शाईन मोटार सायकल , 7 मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 19 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . ताब्यात घेतलेल्या सर्वांच्या चौकशीत एकापेक्षा एक आश्चर्य चकित करणाऱ्या बाबी समोर आल्या . बापलेकांसह साथीदारांनी जालना , परभणी , जळगाव व अहमदनगर जिल्ह्यात स्विफ्ट कार चोरलेल्या असून या गुन्ह्यांत चोरलेल्या स्विफ्ट कार या बाहेर राज्यांत त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने विक्री केल्याचे सांगितले आहे . त्यांच्याकडून आणखीही स्विफ्ट कार चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे . ही कामगिरी औरंगाबाद चे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक भागवत कुंदे , पोलीस उपनिरिक्षक संदीप सोळंके , जमादार संजय काळे , दीपेश नागझरे , श्रीमंत भालेराव , धीरज जाधव , पोलीस नाईक संजय भोसले , नरेंद्र खंदारे , पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर धापसे , योगेश तरमाळे , जीवन घोलप यांनी केली .