सुनील पवार
नांदुरा प्रतिनिधी
मलकापूर विधानसभा मतदारसंघातील मलकापूर व नांदुरा तालुक्यांचा कायम अवर्षण प्रणव तालुक्यात समावेश आहे.त्याच प्रमाणे या दोन्ही तालुक्यातील पूर्णा नदीच्या तीरावरील गावे खारपानपट्ट्यातील आहे.या दोन्ही तालुक्यात जलसंधारणाची कामे करणे नितांत आवश्यक आहे.या अनुषंगाने मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा.ना.श्री.शंकररावजी गडाख यांची भेट घेऊन मतदार संघातील जलसंधारणाच्या कामाचा अनुशेष बाबत ची माहिती दिली.मलकापूर विधानसभा मतदार संघातील विश्वगंगा,नळगंगा व ज्ञानगंगा नदीवर शासनास सादर केलेल्या प्रस्थावास नदी पुनर्जीवन अंतर्गत बंधारे बांधण्या करिता निधी उपलब्ध करून द्यावा तसेच मलकापूर व नांदुरा तालुक्यातील जलसंधारणाच्या नवीन कामाचे सर्वेक्षण करून त्याची अंदाजपत्रक मंजूर करावी अशी मागणी निवेदनाद्वारें केली. मा.मंत्री महोदयांनी जलसंधारणाच्या कामाचा अनुशेष लक्षात घेता मृद व जलसिंचन विभागाचे सचिव यांना सादर बाबत चा प्रस्थाव मंजुरी साठी सादर करण्याचे निर्देश दिले.मा.मंत्री महोदयांच्या सकारात्मकते मुळे मलकापूर विधानसभा मतदार संघात मृद व जलसंधारणाच्या कामासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे….!!