सुनील पवार नांदुरा
शेतकऱ्यांची मक्याची नोंदणी खरेदी विक्री संघ कार्यालय नांदुरा येथे 2 नोव्हेंबर सोमवार सकाळी १० वाजता पासून सुरु होणार आहे. तरीही शेतकरी बांधवांनी मका पेरणीची नोंद खरीप २०२०-२०२१ असलेला सातबारा, बँक पासबुक ची प्रत, आधार कार्ड ,अर्जाच्या दोन प्रती सोबत आणून जोडाव्या. व नोंदणी करावी अशी माहिती खरेदी विक्री संघ प्रशासक यांनी दिली आहे. मका सोंगणी सुरू असतानाच मनसेने मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताकरिता निवेदन दिले होते. पण तरीही यावर काही कारवाई झाली नव्हती नंतर काही दिवसांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मक्याचे कणीस तहसीलदार यांना भेट दिली होती. परंतु काहीही दखल न घेतल्यामुळे जिल्हा पातळीवर मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर डोळ्याला पट्टी बांधून धृतराष्ट्र आंदोलन केले होते. याचा धसका घेत प्रशासनाने 2 नोव्हेंबर पासून मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश जाहीर केले आहे .तालुक्यातील बरेच शेतकरी बंधूनी मनसेच्या पदाधिकारी यांचे आभार सुद्धा व्यक्त केले आहे. जर मका खरेदी केंद्रावर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला तर संबंधित मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. भ्रष्टाचार करणाऱ्यांची गाठ मनसेशी आहे.तरीही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मका खरेदी करिता नोंदणी करावी असे आवाहन मनसे तालुका अध्यक्ष भागवत उगले यांनी केले आहे.अशी माहिती तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश अरुण सपकाळ यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून दिली आहे.