सचीन पगारे ,नांदगांव नाशिक
नांदगांव तालूक्यातील जातेगाव येथील अनुसूचीत जातीत असणार्या खाटीक समाजाच्या दलित वस्ती व रमाई आवास योजनासह विविध मागण्यांसंदर्भात खाटीक समाजातर्फे अखिल भारतीय खाटीक समाज युवा प्रकोष्ट संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमोल खिरडकर यांनी नांदगांव तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली .
जातेगांव येथील खाटीक समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय खाटीक समाज युवा प्रकोष्ट संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल खिरडकर यांनी खाटीक समाजातर्फे तहसीलदार उदय कुलकर्णी व गटविकास अधिकारी जी. पी. चौधरी यांना स्वतंत्र निवेदने सादर केली. सदर निवेदनात म्हटले आहे की, आम्ही जातेगाव येथील कायम रहिवाशी असून अनुसूचित जाती पैकी हिंदू खाटीक या जातीचे आहोत . आमची जातेगाव येथे १५० ते २०० लोकसंख्या असून आम्हाला बऱ्याच वर्षांपासून दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत आमच्या वस्ती परिसरात कुठलीही विकासाची कामे ग्रामपंचायत व पंचायत समितीने केलेली नाही.सदर समाजाच्या प्रत्येक घरासमोर गटारी व्यवस्था नाही. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जातेगाव येथे पन्नास ते साठ लाखांची कामे झाली. परंतु सदर खाटीक समाजाला या योजनेचा एक रुपयाचाही लाभ दिलेला नाही.आम्हाला त्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. संपूर्ण गावात १४व्या वित्त आयोग योजने अंतर्गत नवीन पाईपलाईन बसवण्यात आली,परंतु आमच्या गल्लीत चाळीस वर्षापासून सिमेंटची जुनी पाईपलाईन असल्याने पाणी व्यवस्थित मिळत नाही. रमाई आवास योजनेअंतर्गत जे घरकुले अनुसूचित जातीला दिले जातात ते मात्र ग्रामसभेने सुचवलेल्या यादीप्रमाणे घेतले जात नाही. अनुक्रमांकाने घेण्याऐवजी पुढील नावे घेऊन त्यांची घरकुले मंजूर केली जातात व खाटीक समाजाच्या लाभार्थ्यांना डावलले जाते असे दिसून येते . या सर्व कारणांमुळे आमच्या हक्काचा निधी आम्हाला मिळत नाही. रमाई आवास घरकुल ग्रामसभेने मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना ठरावानुसार यादीतील अनुक्रमांकानुसार आमच्या लाभार्थ्यांना डावलून पुढील लाभार्थी घेतले जातात हा आमच्यावर अन्याय होत आहे. आमच्या लाभार्थ्यांच्या पुढील जे लाभार्थी घेतले गेले आहे. त्यांना पण लाभ द्यावा ही आमची अपेक्षा आहे. परंतु यादीतील डावलले गेलेले आमच्या लाभार्थ्यांची घरकूले दिल्याशिवाय पुढील घरकूलांचे हप्ते टाकू नये. आमच्या खाटीक गल्लीची दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत पाईप लाईन गटार व्यवस्था व रोड काँक्रिटीकरण किंवा गट्टू बसवणे हे तात्काळ झाले पाहिजे .आम्हाला या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले तर संबंधित अधिकाऱ्यांवर आमच्या समाजावर अन्याय केल्यामुळे आम्ही अनुसूचित जाती-जमाती नुसार कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात येईल.सदर निवेदनामार्फत ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांना विनंती केली आहे.निवेदनाचा स्विकार तहसीलदार उदय कुलकर्णी व गटविकास अधिकारी गणेश पी. चौधरी यांनी केला. सदर निवेदनावर अखिल भारतीय खाटीक समाज युवा प्रकोष्टचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अमोल खिरडकर,संजय खिरडकर,ध्रुवबाळ खिरडकर,शिवाजी खिरडकर,संतोष खिरडकर,सुनीता खिरडकर,भावलाल खिरडकर,नाना खिरडकर,आत्माराम खिरडकर आदींच्या सह्या आहेत.