पळशी येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींना भर चौकात गोळ्या घाला – रविकांत तुपकर

तुपकरांनी घेतली पीडितेची व तिच्या कुटूंबियांची भेट..

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील पळशी येथे एका 6 वर्षीय मुलीचे एका 46 वर्षीय नराधमाने अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आज (ता.25 ऑक्टो. 2020) त्या पीडितेची व कुटूंबाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांनी भेट घेतली..ही घटना अतिशय संतापजनक आहे. “तळपायातील आग मस्तकात घालणारी” ही घटना आहे. या घटनेने मन अतिशय व्यथित झाले. महाराष्ट्र हा शिव छत्रपतींचा,शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. बुलडाणा जिल्हा माँसाहेब जिजाऊंचा जिल्हा आहे. जिल्ह्यात अशी घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. या कठीण प्रसंगात त्या कुटुंबाच्या सोबत आम्ही ताकदीनिशी उभे आहोत..सदर घटनेतील आरोपीला जळगाव जामोद पोलिसांनी 3 तासाच्या आत अटक करून तत्परता दाखविली परंतु अशा नराधमांना भर चौकात गोळ्या घाला..! जेणेकरून कुणाची पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत होणार नाही..अशी मागणी यावेळी रविकांत तुपकरांनी सरकारकडे केली आहे..

Leave a Comment