केऱ्हाळा ते पळशी मार्गावरील खड्डे बुजवत केला वाढदिवस साजरा

 

भाजपा तालुका चिटणीस भाऊसाहेब बडक यांचा स्तुत्य उपक्रम

सिल्लोड प्रतिनिधी:सागर जैवाळ

सिल्लोड:सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा तालुका चिटणीस भाऊसाहेब बडक यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने केऱ्हाळा ते पळशी रस्त्यावरचे खड्डे बुजवत सामाजिक कार्य करत आपला वाढदिवस साजरा केला आहे. भाऊसाहेब बडक व कार्यकर्त्यांनी एकत्र येत केऱ्हाळा ते पळशी गावापर्यत खराब झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात केली. केऱ्हाळा ते पळशी रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. हा रस्ता पुढे जळगाव महामार्गाला मिळत असल्यामुळे,व सिल्लोड येथे व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे हा रस्ता रहदारीचा म्हणून ओळखला जातो. सदरच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नेहमी लहान मोठे अपघात होत असतात.कोरोना च्या अनलॉक नंतर पळशी सिल्लोड येथे दर तासाला धावणाऱ्या महामंडळाच्या परिवहन महामंडळाच्या एस.टी ने देखील रस्त्यातील पडलेल्या खड्ड्यामुळे धावण्यास नकार दिला होता. याची दखल घेत भाऊसाहेब बडक यांनी अवांतर खर्चाला फाटा देत या रस्त्यावरची सर्व खड्डे बुजवत समाजाप्रती असणारी संवेदनशीलपणा सामाजिक कार्य करत पूर्ण केला आहे.आता तरी प्रशासनाने यात लक्ष घालून मजबूत रस्ता बनवावा. व भाऊसाहेब बडक यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे पळशी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया 01


भारतीय जनता पार्टीचे तालुका चिटणीस भाऊसाहेब बडक हे नेहमी सामाजिक कार्यात सदैव पुढे राहिलेले आहे. सदरचा रस्ता नेहमी वर्दळीचा असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. आपला वाढदिवस खड्डे बुजवून भाऊसाहेब बडक यांनी अगोदर खड्डे बुजवले.आज त्यांचा वाढदिवस आहे. हे कौतुकास्पद आहे. आता तरी दुर्लक्ष असणाऱ्या प्रशासनानाने याची दखल घेऊन सदरचे काम मार्गी लावावे अशी अपेक्षा आहे.

दत्ता माधवराव बडक
सरपंच पळशी ता. सिल्लोड

प्रतिक्रिया 02

आमचे नेते तालुका चिटणीस यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिलेले आहे. समाजसेवेचे व्रत जपत सदैव सर्व सामान्यांच्या सुख दुःखात ते म्हणाले सहभागी होत असतात. आपला वाढदिवस खड्डे बुजवले. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. प्रशासनाने यातून काहीतरी बोध घ्यावा असे मला वाटते.

*-गजानन बडक*
तंटामुक्ती अध्यक्ष, पळशी ता.सिल्लोड

Leave a Comment