नेते- मंत्र्यांचे फोटोसेशन नको तात्काळ नुकसान भरपाई द्या – रविकांत तुपकर..
रविकांत तुपकरांसह ‘स्वाभिमानी’च्या 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक..
नुकसान भरपाईचे आंदोलन अधिक तीव्र करणार – रविकांत तुपकर..
अजहर शाह मोताळा प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी सडलेले सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून टाकली..यावेळी पोलीस व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला व पोलिसांनी यावेळी रविकांत तुपकरांसह 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले..
पोलिसांनी कितीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी यानंतर नुकसानभरपाईसाठीचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल तसेच नेत्यांच्या व मंत्र्यांच्या फोटोसेशन चा आम्हाला वीट आला आहे.आत्महत्या केल्यावरच मदत देणार का..? असा सवाल उपस्थित करत, शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी रविकांत तुपकरांनी केली..तसेच कापसाच्या हमीभावा पेक्षा कमी किमतीने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून कापसाची हमीभावाने खरेदी करावी व पिक विमा कंपन्यांना सरकारने निर्देश देवुन पिक विम्याची रक्कम जमा करावी,अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली..
या आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले, युवा विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन,संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम अवथळे (घाटाखालील) डॉ.ज्ञानेश्वर टाले (घाटावरील), पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चेके (घाटावरील),अमोल राऊत (घाटाखालील) विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख,नितीन राजपूत,भारत वाघमारे,प्रदीप शेळके,सैय्यद वसीम,राजेश गवई,दत्ता जेऊघाले,मारोती मेढे,प्रफुल्ल देशमुख,आकाश माळोदे यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..तुपकरांसह सर्व कार्यकर्ते अद्यापही बुलडाणा पोलिसांच्या अटकेत आहेत..