उमेद’ च्या महिलांची जळगाव जामोद तहसीलवर धडक.तहसीलदारांना दिले विविध मागण्यांसाठी निवेदन…

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा.प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांनी जळगाव जामोद तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढतात या मोर्चामध्ये तालुका भरातून महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या बाह्य संस्थेचा हस्तक्षेप टाळावा, कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती थांबविण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा गट ग्रामसंघ व प्रभाग संघांना दिला जाणारा निधी वाटप करावा उमेद अभियानातील बाह्य यंत्रणेच्या हालचाली थांबवाव्या कार्यरत संसाधन व्यक्ती चे मानधन त्वरित वितरित करावी

10 सप्टेंबर 2020 च्या अधिकारी-कर्मचारी सेवा खंडित करण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशा विविध मागण्यांचे निवेदन जळगाव जामोद तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आली महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला दिशा देण्याचे काम उमेद च्या महिलांनी आतापर्यंत केले आहे. याशिवाय उच्चशिक्षित तरणांनी यामध्ये कत्राटि सेवा दिली. पुर्वनियुक्ती थांबवुन शासनाने अन्यायकारक निर्णय घेतला असे या निवेदनात म्हटले आहे

Leave a Comment